Shefali Jariwala death : 'कांटा लगा' फेम शेफालीचं ४२व्या वर्षी निधन, मृत्यूचं कारण आलं समोर

shefali jariwala dies of cardiac arrest at age 42 : ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं वयाच्या ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठवणी कायम राहतील.

Kaanta Laga star Shefali Jariwala's shocking death : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास छातीत दुखण्याची तक्रार झाल्याने त्यांचे पती पराग त्यागी यांनी त्यांना अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शेफालीच्या अकस्मात निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. शेफाली जरीवाला यांनी २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या रीमिक्स गाण्याने रातोरात प्रसिद्धी मिळवली. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्यांनी या गाण्यातील नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. गुजरातमधील अहमदाबाद येथे १५ डिसेंबर १९८२ रोजी जन्मलेल्या शेफालीने ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या ‘बिग बॉस १३’ आणि ‘नच बलिए’ सारख्या रिअ‍ॅलिटी शोमधूनही लोकप्रिय झाल्या. त्यांच्या नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांवर मोहिनी घातली होती. त्यांच्या निधनाने चाहते आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

shefali jariwala dies of cardiac arrest at age 42
Shefali jariwala : बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com