केंद्र सरकारनं पालघर जवळील वाढवणमध्ये ऑल वेदर ग्रीनफील्ड बंदर तयार करणार आहे. वाढवण बंदराची जागा ही अत्यंत खास आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर इथं येऊ शकतात. आता वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वाढवण बंदर-इगतपुरी दरम्यान महामार्ग बांधण्यात येणार आहे.
हा महामार्ग ११८ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग असणार आहे. त्यामुळे वाढवण बंदर-इगतपुरी महामार्गाचा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जातोय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत महामार्गावरील चारोटी-इगतपुरी दरम्यानच ८५.३८ किमी लांबीच्या मार्गाचे काम केले जाणार आहे. या महामार्गासाठी १८,०२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग पालघरमधील ३३, तर नाशिकमधील ९ गावांमधून जाणार आहे. पालघरमधील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर बांधण्यात येत आहे.
चारोटी-इगतपुरी महामार्ग पालघर आणि नाशिक अशा दोन जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. तसेच मुंबई-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील तवा येथून हा महामार्ग सुरू होणार आहे. त्यानंतर हा मार्ग समृद्धी महामार्गास इगतपुरी येथे जोडला जाणार आहे. पालघरमधील डडाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांतील ३३ गावांमधून, तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांतील ९ गावांमधून जाणार आहे.
दरम्यान या महामार्गामुळे नाशिक जिल्हा थेट पालघर जिल्ह्याशी जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे औद्याोगिक विकास साधला जाणार आहे. एमएसआरडीसीने चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्गाच्या संरेखनासंबंधीचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठवलाय. या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा एमएसआरडीसीला आहे. चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्गाचे संरेखन झाल्याने पुढील कार्यवाहीला वेग येत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होईल
ही कार्यवाही पूर्ण होण्यास किती कालावधी लागणार हे अजून निश्चित नाहीये. तरी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केले जाईल. ३२.२८ किमी लांबीच्या वाढवण बंदर-तवा द्रुतगती महामार्गासाठी एनएचएआयला एकूण ६०६ हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. एमएसआरडीसीला ८५.३८ किमी लांबीच्या तवा, चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्गासाठी एकूण ९२३.८० हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. पालघरमधील ३३ आणि नाशिकमधील ९ गावांमधील जमीन यात जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.