रायगडात नववर्ष स्वागताला येणार असाल तर वाचा ही बातमी! Saam TV
महाराष्ट्र

रायगडात नववर्ष स्वागताला येणार असाल तर वाचा ही बातमी!

कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर (रायगड)

रायगड : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली असल्याने राज्याची चिंता वाढली आहे. रायगडात पनवेल महानगरपालिका (Raigad-Panvel Muncipal Corporation) परिसरात कोरोना वाढू लागला असला तरी उर्वरित ग्रामीण भागात अजून आटोक्यात आहे. नववर्ष स्वागताला पर्यटक हे रायगडात येऊ लागले असल्याने कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पर्यटकांनी दोन डोस घेतले असतील तरच हॉटेल मध्ये राहण्यास परवानगी मिळणार आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी केल्यास कारवाई होणार आहे. मास्क न वापरण्यावर प्रशासनाकडून दंड आकारणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे रायगडात (Raigad) नववर्ष स्वागताला येणार असाल तर पर्यटकांना कोरोनाच्या (Corona) नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. नववर्ष स्वागत आणि कोरोनाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन ही सज्ज झाले आहे.

रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने नववर्ष स्वागताला पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात. समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड किल्ले, प्रेक्षणीय स्थळे ही पर्यटकांनी बहरून जातात. मात्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात नागरिकांच्या लसीकरणाचा (Corona Vaccine) वेग वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने कॉटेज, हॉटेल, रिसॉर्ट हे हाऊसफुल झाले आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सर्व हॉटेल व्यवसायिकाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. पर्यटकांनी दोन डोस घेणे अनिर्वाय असून त्यानंतरच त्यांना हॉटेल, कॉटेज, रिसॉर्ट मध्ये राहण्यास परवानगी दिली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास हॉटेल व्यवसायिकवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी मास्क न घातल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त जणांना गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नववर्ष स्वागत पार्ट्यावरही प्रशासनाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत हे घरात राहूनच करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नववर्षाच्या अनुषंगाने चोख पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यातील 28 पोलीस ठाणे हद्दीत विशेष पथक तयार करण्यात आली असून हॉटेल, धाबे, कॉटेज फार्म हाऊसवर गैरकृत्य होण्यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्हा वाहतूक दलातर्फे 81 ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 83 वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस ठाणे हद्दीत समुद्रकिनारी आणि पर्यटन ठिकाणी फिक्स पॉईंट, पेट्रोलिंग,नाकाबंदी आणि बंदोबस्त साठी 71 पोलीस अधिकारी, 402 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविण्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT