BMC
BMCSaam TV

BMC: 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी

सन २००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी लसीकरणासाठी (Corona Vaccine) पात्र राहतील.
Published on

मुंबई : जागतिक पातळीवर वाढणारी कोविड रुग्णांची संख्या व ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड- १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) तसेच स्टैंडिंग टेक्निकल सायन्टीफीक कमिटी (STSC) of (NTAGI) यांनी कोविड १९ लसीकरण वाढविण्यासाठी निर्देश दिले असून मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 (Coronavirus) मोहिमेचा महत्वाचा टप्पा कार्यान्वित होणार आहे . या टप्प्यात लसीकरणसाठी खालील मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत .

BMC
PCMC मध्ये ओमिक्रॉनचा पहिला बळी; नायजेरियातून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू

- सन २००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी लसीकरणासाठी (Corona Vaccine) पात्र राहतील.

- लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाइल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोदणी करता येईल.

- ही ऑनलाइन सुविधा दि. १ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल.

- लसीकरण केंद्राच्या ठिकाणी (onsite) जाऊन नोदणी करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

- १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभर्थ्यासाठी कोविड १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) यांनी केवळ कोवॅक्सिन लस वापराबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com