Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा तडाखा; अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान, कृषी विभागाकडून नुकसानीची आकडेवारी जाहीर

Maharashtra Rain : गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : राज्यात मागील तीन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे प्रचंड नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसला असून कृषी विभागाकडून नुकसानीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २३ जिल्ह्यात तब्बल २३ हजार ३३१ हेक्टर शेतावरील पिकाचे नुकसान झाले आहे. यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तेथील अनेक भागांत उभ्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये मुख्यतः भाजीपाला, फळ पिके आणि उन्हाळी हंगामातील पिकांचा समावेश आहे. तर आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट 
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६ ते १६ मे या कालावधीत राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पपई, केळी, आंबा, डाळिंब, चिकू, लिंबू, संत्रा अशा फळपिकांबरोबरच कांदा, भाजीपाला, बाजरी, मका आणि उन्हाळी भात अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झाडांना लागलेली फळे गळून पडली असून इतर पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

अमरावतीला अवकाळीचा सर्वाधिक फटका 

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला आहे. अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार आणि चिखलदरा या तालुक्यांमध्ये तब्बल १० हजार ८८८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या खालोखाल जळगाव जिल्ह्यात ४३९६ हेक्टर, नाशिक १७८७ हेक्टर, जालना १६९५, चंद्रपूर १०३८, पालघर ७९६, धुळे ६४५, पुणे ४८०, गडचिरोली ४३२, वाशिम २०३, परभणी १८३, बुलढाणा १८१, यवतमाळ १७९, सोलापूर व गोंदिया १४३ हेक्टर, भंडारा ७५, नंदुरबार ५३, नागपूर ४२, वर्धा २३, रायगड १७, अहिल्यानगर १४, नांदेड ७, ठाणे १ हेक्टर इतके नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT