Maharashtra Unseasonal Rain Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain: जालना-वाशिम आणि पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

Pune Unseasonal Rain: पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली. पुण्याच्या भोर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाळे नागरिकांचे हाल झाले. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला.

Priya More

राज्यात एकीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेत पिकांसह घरांचे नुकसान झाले आहे. आजही राज्यातील जालना, वाशिम आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली.

जालना -

जालना जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागांसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतपिकांसह मोसंबी आणि आंब्याच्या बागांना फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.

वाशिम -

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज दुपारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरूळपीर तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

पुणे -

पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली. पुण्याच्या भोर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाळे नागरिकांचे हाल झाले. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. पण शेतकऱ्यांसह अनेकांसाठी पाऊस डोकेदुखी ठरला आहे. भोरच्या आठवडे बाजाराला या अवकाळी पावसामुळे फटका बसला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली. बाजारातील भाजीपाला भिजला त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान झाले.

पिंपरी चिंचवड -

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी पिंपळे सौदागर आणि रहाटनी भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. पिंपरी चिंचवड शहरात अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची धावपळ झाली. ट्रॅफिक सिग्नलच्या खांबाला बांधलेले अनधिकृत होर्डिग कोसळले. सिग्नलचा खांब ही कोसळला. पिंपरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील शगुन चौकामध्ये ही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: माण-खटावमध्ये होणार काँटे की टक्कर; जयकुमार गोरेंना प्रभाकर घार्गेंचं आव्हान

Assembly Election: व्होट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध; देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला नोमानींचा ऑडिओ

Goddess Lakshmi : लक्ष्मी प्राप्तीसाठी फक्त खास 10 उपाय करा, तुमच्यावर सदा पैशांची कृपा राहील

Horoscope Today : आज काहींना गुंतवणुकीसाठी चांगला दिवस, तर कोणाचे पैसा वाया जाण्याची शक्यता; तुमची रास यात आहे का?

Uddhav Thackeray: स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

SCROLL FOR NEXT