unseasonal rain Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra unseasonal rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; कुठे-कुठे पाऊस कोसळला? वाचा एका क्लिकवर

Maharashtra unseasonal rain update : राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. कल्याण, पुण्यासह विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपलं.

Vishal Gangurde

Maharashtra Rain Update : राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर सायंकाळी विविध भागात पाऊस कोसळला. कल्याण, पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस कोसळला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावाधाव झाली. या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झाल्याचं दिसून आलं. या पावसाने रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचंही दिसून आलं.

कल्याणमध्ये अवकाळी

कल्याणमध्ये सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. कल्याणमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. या पावसामुळे खरेदीनिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची, घराकडे परतणाऱ्या नागरिकांची तारांबळ झाली.

पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

पुणे शहर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक बरसलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं.

शिरुरमध्ये  जोरदार पाऊस

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात सोमवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. काही भागांत विजेचा पुरवठाही खंडित झाला होता. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

जत तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

सांगलीच्या जत तालुक्याला आवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. जत तालुक्यातील पूर्व भागातील संख, गोंधळवाडी सह परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस बरसला. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळेवाडी, गुड्डडापूर,असंगीतुर्कसह परिसरातील रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली आहे. तसेच अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेल्याचा प्रकार घडले आहेत. तर वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. रस्त्यावरून पडलेली अनेक झाडे तुकाराम बाबा महाराज यांच्या माध्यमातून रात्रभर प्रयत्न करून हटवण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरात दमदार अवकाळी पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास सर्वच भागात आज संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यात काही ठिकाणी पुढील 24 तासांत अवकाळी पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यातच आज संध्याकाळी सहा वाजता दरम्यान सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

अहमदनगरच्या राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झालंय. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, राहाता परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी दुकानांचे पत्रे उडून गेल्याचे चित्र आहे. नगरच्या साकुरी गावात अनेक वर्षे जुने वडाचे झाड ग्रामदैवत विरभद्र महाराजांच्या मंदिरावर पडल्याची घटना घडलीये. या वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT