latur Accident : लातूरमध्ये भीषण अपघात; भरधाव टॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत रिक्षाचा चुराडा, ३ जण जागीच ठार

latur Accident Update : लातूरमध्ये भीषण अपघात झालाय. टॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
latur Accident News
latur AccidentSaam tv
Published On

संदिप भोसले, साम टीव्ही

लातूर : राज्यात अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये सोमवारी भीषण अपघताची घटना घडली आहे. लातूर बार्शी महामार्गावरच्या पाखरसांगवी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

लातूर बार्शी महामार्गावरच्या पाखरसांगवी उड्डाणपुलावर रिक्षा आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोरिक्षा मधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. लातुरातील हा अपघात एवढा भीषण आहे की, रिक्षाचा संपूर्ण चुराडा झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

latur Accident News
Mumbai Crime : मुंबई हादरली! 2 कुटुंंबाचा जुना वाद टोकाला गेला; कोयत्याने एकमेकांवर हल्ला, तिघांचा मृत्यू

पाखरसांगवी उड्डाणपुलावर अपघात झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. अपघातानंतर उड्डाणपुलावरील नागरिकांची एकच धावाधाव झाली. या अपघातात रिक्षाचा चुराडा झाला. या रिक्षात असलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर उड्डाणपुलावर बघ्यांची एकच गर्दी झाली.

अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वाहनधारकांची वाहतूक कोंडींतून सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी उड्डाणपुलावरील गर्दी पांगवली.

latur Accident News
Thane Water Supply : पाणी जपून वापरा! ठाण्यात बुधवारी पाणीबाणी; कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद?

खेडमध्ये भीषण अपघात

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले कुटुंब अंत्यसंस्काराला निघाले होते. मुंबईच्या मिरा रोड येथून देवरुखला हे कुटुंब निघालं होतं. देवरुखला जाणाऱ्या या कुटुंबावर काळा घातला. या कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com