Nitin Gadkari speech in nagpur :  Saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari Speech : युट्यूबवर केंद्रीय मंत्र्यांची धूम! एका गाण्यातून कमावले हजारो रुपये, नितीन गडकरींनी काय दिला संदेश?

Nitin Gadkari speech in nagpur : निवडणुकीतील एका गाण्याच्या रॉयल्टीतून मला ८५ हजार कमावल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. चांगलं काम केल्यावर कोणालाच कळलं नाही पाहिजे, असा संदेश नितीन गडकरी यांनी दिला.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : 'निवडणुकीत एक गाणं तयार केलं. त्या गाण्याच्या रॉयल्टी म्हणून ८५ हजार रुपये मिळाले. चांगलं काम करा. काम केल्यानंतर कोणालाच कळलं नाही पाहिजे, असं केंद्रीय नितीन गडकरी म्हणाले. ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांशी बोलताना राजकारण्यांचे कान टोचले. नितीन गडकरी म्हणाले, 'राजकारणी जसे बोलतो, तसे करत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे अस वाटतं. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत'.

'लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचार बोललो, जातपात पाळत नाही. मला मत द्या किंवा नका देऊ. जो म्हणणार जात, त्याला बसणार लाथ असंही बोललो. चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केलं पाहिजे, असे ते म्हणाले.

'पैसा हे साधन आहे पण साध्य नाहीये. माझा निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले. ते गाणे युट्यूबवर टाकले. ते गाणे 90 लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्यापोटी रॉयल्टी म्हणून 85 हजार रुपये मला आणून दिले. चांगलं काम करा, आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळल नाही पाहिजे, पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे, असे म्हणत टोला हाणला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले,'आपण भाषेचा आग्रह धरला नाही, तर भाषा लोप पावते. ती भाषा संपून जाते. विदर्भातील रिद्धपूरची चर्चा करतो. त्याच रिद्धपूरमध्ये मराठीतला आद्य ग्रंथ तयार झाला. तो महानुभाव पंथीयांनी तयार केला. चक्रधर स्वामी किंवा महानुभाव पंथीयांनी फक्त ग्रंथच रचले नाही. तर त्यांनी परकीय आक्रमणापासून मराठीतील ग्रंथ संपदा वाचवली. त्यामुळे मराठी भाषेच्या विकासात महानुभाव पंथाचा योगदान अनन्यसाधारण आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT