Nagpur News: ATM मधून काढले 500, मिळाले 1100! पैसे काढायला लोकांची गर्दी; नेमका काय आहे प्रकार?

Nagpur ATM News: नागपूरच्या खापरखेडा एटीएममधून विड्रॉल पेक्षा अधिकचे पैसे निघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हीच संधी साधून अनेकांनी एटीएमवर बिघाडावर संधी साधत जास्तीत जास्त पैसे विड्रॉल केले आहेत.
ATM मधून काढले 500, मिळाले 1100! पैसे काढायला लोकांची गर्दी; नेमका काय आहे प्रकार?
ATM मधून काढले 500, मिळाले 1100! पैसे काढायला लोकांची गर्दी; नेमका काय आहे प्रकार?Saam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नागपूरमध्ये ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये घडलेली एक तांत्रिक चूक शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एटीएममधून प्रत्येक विड्रॉलमागे 600 रुपये अतिरिक्त येत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी झुंबड केली.

मिळाली माहितीनुसार, खापरखेडा येथील बाजार चौकातील हे ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये पैसे टाकताना तांत्रिक चूक झाली, असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही चूक खातेधारकांना अधिकचे पैसे काढण्याची संधी देऊन गेली. खापरखेडा शहराच्या मध्यभागी असलेल्या ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank ) एटीएमध्ये गावात पैसे काढण्यासाठी धांदल उडाली. विशेष म्हणजे हा प्रकार पहिल्यांदा नाही, तर यापूर्वी सुद्धा एकदा घडला आहे. एटीएममध्ये बुधवारी संध्याकाळपासून तांत्रिक बिघाड आला. जो तो आपल्या जवळच्या लोकांना ही बातमी देत विड्रॉल करायला लावत होता.

ATM मधून काढले 500, मिळाले 1100! पैसे काढायला लोकांची गर्दी; नेमका काय आहे प्रकार?
Ajit Pawar: घरात फूट पाडू नका, मी चूक केलीय; नाव न घेता अजित पवारांची कुबली

अनेकांनी पाचशे रुपये काढले असताना त्यांना सहाशे रुपये अधिक म्हणजे 1100 रुपये मिळत होते. तसेच हजार रुपये काढले असता 1600 रुपये म्हणजे 600 रुपये अधिक अतिरिक्त मिळत होते. एटीएम (ATM Machine) मध्ये पैशाच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं बोलल जात आहे.

बँकेत (Bank) विड्रॉलपेक्षा अधिक पैसे मिळत आहे, असे समजल्यावर जिथं अनेकांना संधी दिसली तिथं, सकाळचे वृत्तपत्राचे प्रतिनिधी दिलीप गजभिये आणि, त्याचे मित्र अरुण महाजन यांनी जवाबदार नागरिक म्हणून भूमिका पार पडली. पोलिसांनी एटीएमचे शटर पाडत लोकांना यापासून दूर केलं. त्यानंतर एटीएममध्ये पैसे टाकणारी एजन्सीच्या कर्मचारी यांनी बिघाड दुरुस्त केला. पण तोपर्यंत 3 लाखापेक्षा जास्त अधिकची रक्कमवर संधी साधूंनी डल्ला मारला होता.

ATM मधून काढले 500, मिळाले 1100! पैसे काढायला लोकांची गर्दी; नेमका काय आहे प्रकार?
Maharashtra Politics : महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना बुद्धी द्या!; भुजबळांचा रोख कुणाकडे?

दरम्यान, नागपूरतील भरबाजार चौकात असलेले एटीएमवर कुठलाही सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळेच हा प्रकार घडल्यावर जवळपास 12 ते 14 तास लोकांनी विड्रॉल करत अधिकचे पैसे काढण्याची संधी साधली. पण सुरक्षारक्षक असता तर हा प्रकार वेळीच लक्षात आला असता. तसेच लाखो रुपयांची रक्कम संधी साधूनच्या हातात जाण्यापूर्वी हा प्रकार थांबवता आला असता. मात्र एटीएमवर सुरक्षारक्षक नसल्याचा पुन्हा एकदा फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com