Assembly Election 2024: विधानसभेच्या मैदानात नितीन गडकरी, निवडणूक जिंकण्यासाठी काय आहे भाजपचा मेगा प्लॅन?

Maharashtra Politics: आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
विधानसभेच्या मैदानात नितीन गडकरी, निवडणूक जिंकण्यासाठी काय आहे भाजपचा मेगा प्लॅन?
Nitin GadkariSaam Tv
Published On

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभेतील पिछेहाट भरुन काढण्यासाठी महायुतीचे सर्व शिलेदार सज्ज झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली आहे. राज्यातील प्रचाराची धुरा 4 प्रमुख नेत्यांवर देण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे पाटील यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे जालन्यातून पराभूत झालेल्या दानवेंकडे पक्षाने ही मोठी जबाबदारी दिली आहे. रावसाहेब दानवे-पाटील हे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख संयोजक असणार आहेत.

विधानसभेच्या मैदानात नितीन गडकरी, निवडणूक जिंकण्यासाठी काय आहे भाजपचा मेगा प्लॅन?
Maharashtra Assembly Election 2024: 'सत्ता बदलायची...', शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! विधानसभेसाठी काय आहे मेगा प्लॅन?

नितीन गडकरीही विशेष प्रचारक म्हणून एक महिना महाराष्ट्र मध्ये असणार आहेत. आश्वासक चेहऱ्यामुळेच गडकरींवर संघाची मदार आहे. नितीन गडकरी यांचा विकासात्मक चेहरा भाजपला उपयुक्त ठरण्याचा अंदाज आहे. गेली काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. तसंच महाराष्ट्रात सर्वच पक्षांशी गडकरींचे सलोख्याचे संबंध आहेत. भाजपा व्यवस्थापन समितीमध्ये कोण आहेत ते जाऊन घेऊ...

भाजपची निवडणूक व्यवस्थापन समिती

निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील प्रमुख संयोजक असणार आहेत. अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा समितीत समावेश.

विधानसभेच्या मैदानात नितीन गडकरी, निवडणूक जिंकण्यासाठी काय आहे भाजपचा मेगा प्लॅन?
CM Eknath Shinde Exclusive : 'महायुतीचा कॅप्टन मीच', CM शिंदे काय म्हणाले? वाचा

दरम्यान, येत्या आठवड्याभरात २० स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. आता ही स्टार नेत्यांची फौज भाजपला किती फायदेशीर ठरणार ते पहायचं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com