Maharashtra Assembly Election 2024: 'सत्ता बदलायची...', शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! विधानसभेसाठी काय आहे मेगा प्लॅन?

Sharad Pawar's Mega Plan For Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात लोकसभेत महायुतीला जबर फटका बसला,तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बरचं यश मिळालं.याच लाटेचा फायदा आता विधानसभेत घेऊन पक्ष आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न शरद पवारांचा असणार आहे.
Maharashtra Assembly Election 2024: 'सत्ता बदलायची...', शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! विधानसभेसाठी काय आहे मेगा प्लॅन?
Sharad PawarSaam TV

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीत उपमुख्यमंत्रिपद मिळालं. मात्र शरद पवारांना सहानूभुती मिळाली. त्याच्याच जोरावर पवारांनी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेटनं 10 पैकी 8 जागा जिंकल्या. आता याच लाटेचा विधानसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठी शरद पवरांनी मेगा प्लॅन आखलायं.

त्यासाठी पवारांनी दौऱ्याला देखील सुरुवात केलीये. त्याची सुरुवात पवारांनी इंदापूर दौऱ्यातून केलीये. या दौऱ्यात पवारांनी थेट सत्ता बदलण्याची घोषणा करत विधानसभेचं रणशिंग फुंकलंय. विरोधकांना धक्का देण्यासाठी शरद पवारांनी आतापासूनच मेगा प्लॅन तयार केलाय. काय आहे पवारांचा मेगा प्लॅन? जाणून घेऊ...

Maharashtra Assembly Election 2024: 'सत्ता बदलायची...', शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! विधानसभेसाठी काय आहे मेगा प्लॅन?
Sharad Pawar: 4 महिन्यात मविआचं सरकार येणार, शरद पवार यांचा दावा

विधानसभेसाठी पवारांचा मेगाप्लॅन?

विधानसभेसाठी आताच पवारांनी 30 उमेदवार निश्चित केल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित करण्यात आल्याचं समजतं आहे. साताऱ्यात शरद पवारांच्या पक्षाची ताकद कायम आहे. कराड उत्तर, वाई, पाटणमध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वाढीव मताधिक्य आहे. मताधिक्य मिळालेल्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची चाचपणी सुरु आहे.

यासाठी पवारांनी दुष्काळाच्या मुद्याला हात घालत बारामती, इंदापूर, दौंड या भागाचा दौराही सुरू केलाय. गावोगावी पवार शेतक-यांशी संवाद साधत आहेत. पवारांच्या याच खास शैलीचा धसका त्यांच्या विरोधकांनी घेतलाय. शरद पवारांनी मागील विधानसभा निवडणुकीत पावसात भिजून निवडणुकीचं गणितं बदललं होतं. आता पवार पुन्हा मैदानात उतरुन विधानसभेसाठी मेगाप्लॅन आखतायत.

Maharashtra Assembly Election 2024: 'सत्ता बदलायची...', शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! विधानसभेसाठी काय आहे मेगा प्लॅन?
Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदासाठी 26 जून रोजी होणार निवडणूक, 3 जुलैपर्यंत चालणार संसदेचे अधिवेशन

लोकसभेत बाजी मारलेल्या पवारांनी यशात गाफील न राहता विधानसभेची आतापासूनच तयारी सुरू केलीय. त्यात त्यांनी शेतक-यांच्या मुद्यांना हात घालत सत्ता बदलाची साद घातलीय. त्यामुळे पवारांच्या सत्ता बदलाच्या नॅरेटीव्हला लोकसभेत घायाळ झालेले सत्ताधारी कसा प्रतिकार करतात याकडे लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com