Amit Shah Maharashtra Visit Saam Tv
महाराष्ट्र

Amit Shah Maharashtra Visit: गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

Amit Shah Sambhaji Nagar Visit: गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे

Amit Shah Latest News

गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी (४ मार्च) रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर 186 अधिकारी, 1800 पोलिसांसह एसआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (latest politics news)

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या सभेला अनेक दिग्गज नेते राहणार सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर (Amit Shah Sambhaji Nagar Visit)आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Loksabha Election) संभाजीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांची सभा

त्यामुळे सायंकाळपासूनच शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अमित शाह यांची सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार (Amit Shah News) आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदिपान भुमरे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, (Amit Shah Maharashtra Visit) पंकजा मुंडे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि आमदार या सभेला हजर असतील.

'असा' असेल पोलीस बंदोबस्त

शहरात सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या नेतृत्वाखाली 6 पोलीस उपयुक्त तैनात करण्यात आले (Amit Shah Police Security) आहेत. 11 सहायक आयुक्त, 41 पोलीस निरीक्षक, 128 उप निरीक्षक, 1277 पुरूष अंमलदार, 140 महीला अंमलदार 1 SRPF जवानांनी तुकडी तैनात आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षिततेसाठी हा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त अमित शाह यांच्या संभाजीनगरच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

The Bengal Files: विरोधामुळे लाईट बंद केले अन्...; 'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये गोंधळ, विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले...

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT