केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या बहिणेचे नाव राजेश्वरीबेन शाह, असं आहे.
राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. राजेश्वरीबेन यांचे वय 60 च्या जवळपास असल्याचं सांगितलं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याबाबत माहिती देताना भाजपच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राजेश्वरीबेन यांची प्रकृती काही काळापासून ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. जिथे त्यांनी सोमवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. बहिणीच्या निधनानंतर अमित शाह यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. (Latest Marathi News)
राजेश्वरीबेन यांचे पार्थिव आज सकाळी अहमदाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. आज येथील थलतेज स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, अमित शाह हे भाजप समर्थकांसोबत मकर संक्रांत साजरी करण्यासाठी अहमदाबादमध्ये होते. सोमवारी ते बनासकांठा आणि गांधीनगर जिल्ह्यातील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. बनासकांठामध्ये अमित शाह देवदार गावात बनास डेअरीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते. दुपारी ते गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करणार होते. मात्र आता त्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.