Union Budget 2024 Live Updates: Saamtv
महाराष्ट्र

Union Budget 2024: अर्थसंकल्पात नितीश कुमार, चंद्राबाबूंना खैरात, सर्वाधिक कर भरणाऱ्या महाराष्ट्राला मात्र ठेंगा', विरोधक संतापले!

Union Budget 2024 Live Updates: या बजेटमध्ये मुंबई, तसेच महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप| दिल्ली, ता. २३ जुलै २०२४

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या बिहार तसेच आंध्रप्रदेशसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई तसेच महाराष्ट्रासाठी मात्र कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावरुन संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत आंदोलन करत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बिहार, आंध्रप्रदेशसाठी मोठ्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये एनडीत सहभागी असलेल्या नितीश कुमार यांच्या बिहारसाठी तसेच चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्रप्रदेशसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशाला अतिरिक्त 15 हजार कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राला मात्र ठेंगा

मात्र या बजेटमध्ये मुंबई, तसेच महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शोभा बाच्छाव, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर, प्रियंका चतुर्वेदी आदी नेते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट् आणि मुंबईच्या तोंडाला पान पुसण्याच काम सरकारने केले, येणाऱ्या काळात जनता विधानसभेच्या निवडणुकीत यांना धडा शिकवेल, असा इशारा यावेळी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

विजय वडेट्टीवार संतापले!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा!

देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेट मध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT