nashik Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार; नाशिकमध्ये खळबळ

Tribal Residential School: नाशिकच्या कळवण तालुक्यातील आदिवासी निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आलीये. प्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आदिवासी विकास विभागाने चौकशी सुरू केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी आदिवासी निवासी आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीच्या बाळंतपणाची घटना समोर आली आहे. यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित विद्यार्थीनी अल्पवयीन असून ती आश्रम शाळेत शिक्षण घेत असताना ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी उन्हाळी सुट्टीदरम्यान गावी गेली असताना तिच्यावर नात्यातील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ती गर्भवती राहिली आणि अलीकडेच तिने बाळाला जन्म दिला. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास विभागाने प्रकल्प कार्यालयामार्फत चौकशी सुरू केली आहे. आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितलं की, "संबंधित मुलगी आश्रम शाळेत शिक्षण घेत होती. उन्हाळी सुट्टीत ती गावी गेली असताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. विभागीय स्तरावरही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे."

दरम्यान, आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात असल्याचा दावा केला जातो. मात्र संबंधित विद्यार्थिनी गर्भवती असल्याची बाब वेळेत लक्षात का आली नाही, आरोग्य तपासणी आणि देखरेखीत कुठे त्रुटी राहिल्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होतोय. तसंच या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

या घटनेनंतर पालक आणि सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला असून आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT