OYO  Saam Tv
महाराष्ट्र

Unauthorized OYO Hotels: OYOचा स्थानिकांना मनस्ताप, अनधिकृत OYO हॉटेल्स हटवण्यासाठी केली गांधीगिरी

Controversy Over New OYO Hotel: शासनाची आणि मनपाची परवानगी न घेता, चंद्रपुरात चौदाहून अधिक ओयो हॉटेल्स सुरू आहेत. दरम्यान, ओयो हटवा मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी गांधीगिरी स्टाईल आंदोलन केलंय.

Bhagyashree Kamble

चंद्रपूरच्या बल्लारपूर आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात ओयो हॉटेल्स आहेत. शासनाची आणि मनपाची परवानगी न घेता, चौदाहून अधिक हॉटेल्स सुरू आहेत. दरम्यान, ओयो हटवा मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी गांधीगिरी स्टाईल आंदोलन केलंय. हॉटेलसमोरच स्थानिकांनी भजन आंदोलन केलंय. तसंच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील अनधिकृत हॉटेल्स हटवा, अशी मागणी प्रशासनाकडे केलीय.

प्रेमी युगुलांना योग्य ती सुविधा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी ओयो हॉटेल बदनाम आहेत. चंद्रपुराच्या बल्लारपूर आणि इतर भागात ओयो हॉटेल्स असून, फक्त बल्लारपूर वळण मार्गावर ओयो फलक लावलेले चौदाहून अधिक हॉटेल्स आहेत. शासनाची आणि मनपाची परवानगी न घेता, ओयो हॉटेल्स सर्रासपणे सुरू असल्याची माहिती आहे.

मुख्य म्हणजे बल्लारपूर वळण मार्गावरील, अष्टभुजा मंदिराच्या बाजूलाच, नवीन ओयो हॉटेल तयार झालंय. मंदिराच्या बाजूलाच आणखीन एक नवं ओयो हॉटेल तयार झाल्यानं, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाला याबाबत माहिती देऊनही, कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यावरून ओयो हटवा मागणीसाठी परिसारतील नागरीकांनी गांधीगिरी स्टाईल आंदोलन केलंय.

परिसरातील नागरीकांनी ओयो हटवा मागणीसाठी हॉटेलसमोरच भजन आंदोलन केलंय. ही गांधीगिरी आंदोलन लक्षात येताच, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील अनधिकृत हॉटेल्स हटवा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. समाजस्वास्थ बिघडणे आणि या कारणावरून मुली फसवल्या जातात, असंही जोरगेवार यांनी म्हटलंय. आता या महत्त्वाच्या मुद्यावर शासन काय भूमिका घेणार, याकडे चंद्रपुरकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT