Ulhasnagar Sanctuary Company workers death on the Spot many injured  Saam TV
महाराष्ट्र

Ulhasnagar News: उल्हासनगर येथील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; २ कामगारांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

Ulhasnagar Sanctuary Company News: उल्हासनगर येथील सेच्युरी कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. स्फोटामध्ये चार ते पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अजय दुधाने

Ulhasnagar Sanctuary Company Blast

एकीकडे मुंबईत गणेशोत्सव आनंदात साजरा केला जात असताना दुसरीकडे उल्हासनगरमधून एक भयानक घटना समोर आली आहे. उल्हासनगर येथील सेच्युरी कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. उल्हानगर (Ulhasnagar News) शहरात सेच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीच्या CS2 डिपार्टमेंटमध्ये शनिवारी १२ वाजेच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला.

हा स्फोट इतका भीषण होता, की शहरातील तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर, परिसरातील घरांना हादरे बसले. या भीषण स्फोट आतापर्यंत २ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळाताच स्थानिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात कामगारांवर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT