Ulhasnagar News  Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : कार बाजूला घेण्यावरून दोन मित्रांना जबर मारहाण; मारहाणीत तरुण गंभीर जखमी

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक तीन परिसरातील एका हॉटेलजवळ मनीष चेतनानी हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. त्याने आपली कार उभी केली.

अजय दुधाणे

उल्हासनगर : कार बाउल घेण्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या मित्राला जबर मारहाण केल्याचा प्रकार (Ulhasnagar) उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या बाहेर लावलेल्या (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Maharashtra News)

उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक तीन परिसरातील एका हॉटेलजवळ मनीष चेतनानी हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. त्याने आपली कार उभी केली. तेथून कार घेऊन जाणाऱ्या राय नावाच्या व्यक्तीने मनीषला कार हलविण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर राय आणि त्यांचा मुलगा कुणाल राय याने मनीष चेतनानी आणि त्याच्या मित्राला जबर मारहाण केली. (Crime News) या हाणामारीत मनीष गंभीर जखमी झाला असून त्यांच्या खांद्यावर एक शस्त्रक्रिया झाली असून अजून दुसरी शस्त्रक्रिया येत्या दिवसात केली जाणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या प्रकरणी फक्त कुणाल राय यांच्याविरुद्ध मध्यवर्ती पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात उल्हासनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, इथे कोण कोणाला मारेल याचा नेम नाही. गेल्या सप्ताहात शहरात हल्ले आणि मारहाणीच्या सहा ते सात घटना घडल्या आहेत. मनीष चेतनानीला बेदम मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मनीष चे मित्र रवी वासवानी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT