Lok Sabha Election : राष्ट्रवादी अजित पवार गट तुळजाभवानी चरणी; लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी घातले साकडे

Dharashiv News : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. मात्र भाजप, राष्ट्रवादी अजित पवव गट व शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीतील उमेदवारी घोषित होणे बाकी आहे
Tulja Bhavani
Tulja BhavaniSaam tv

बालाजी सुरवसे 

धाराशिव : लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. मात्र (BJP) भाजप, राष्ट्रवादी अजित पवव गट व शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीतील उमेदवारी घोषित होणे बाकी आहे. यामुळे धाराशिव (Dharashiv News) मतदार संघातील उमेदवारी मिळण्यासाठी अजित पवार गटाकडून तुळजाभवानीला साकडे घालण्यात आले. (Latest Marathi News)

Tulja Bhavani
Kolhapur To Tirupati Flight : कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा मार्चअखेर सुरू हाेणार, जाणून घ्या फ्लाईटची वेळ व दिवस

धाराशिव लोकसभेची जागा ही महायुतीकडून राष्ट्रवादीला देण्यात यावी; यासाठी राष्ट्रवादीचे प्रा. सुरेश बिराजदार इच्छुक असुन त्यांनाच उमेदवारी मिळावी. यासाठी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (Tulja Bhavani) चरणी साकडे घातले आहे. धाराशिव लोकसभेच्या जागेसाठी (Lok Sabha Election) राष्ट्रवादी आग्रही असुन सुरेश बिराजदार हे सक्षम नेतृत्व असुन त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यासाठी मोठी आग्रही मागणी केली जात आहे.  

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tulja Bhavani
Congress Jan Aakrosh Morcha: काँग्रेसचा लाखनी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

तिन्ही पक्षांकडून दावा 

महायुतीमध्ये सध्या ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यातच भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे अजित दादांनी यामध्ये लक्ष घालुन ही राष्ट्रवादीला घेवुन प्रा. सुरेश बिराजदार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com