Ulhasnagar News : क्षुल्लक कारणावरून दोन व्यापारी भावांना मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरात अशा घटनांची वाढ झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचां प्रश्न उपस्थित झाला
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv

 

उल्हासनगर : काही एक कारण नसताना घराच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यापारी व्यक्तीला काही जणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार (Ulhasnagar) उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच भागात घडला असून याबाबत पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Ulhasnagar News
Pachora News : आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच भागात व्यापारी भरत तनवाणी प्रभाराम मंदिराजवळ घराबाहेर उभे होते. या दरम्यान काही जण तेथे आले असता त्यांनी भरत तनवाणी यांना क्षुल्लक कारणावरून काही व्यक्तींनी मारहाण केली. (Crime News) त्यावेळी त्यांचा भाऊ मदतीसाठी आला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यानंतर मारहाण करणारे पसार झाले असून मारहाण करणारे कोण याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ulhasnagar News
Bharat Jodo Yatra : भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त राहुल गांधी उद्या धुळ्यात; आमदार पाटलांकडून आढावा

व्यापाराला मारहाण झाल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कैद झाली आहे, सदर मारहाण प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात दोघा व्यापाऱ्यांनी तक्रार दाखल केली असून सीसीटिव्हीच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहे. उल्हासनगर शहरात अशा घटनांची वाढ झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचां प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com