Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : पाय घसरून पडल्याने विद्यार्थ्याचा हात मोडला; रुग्णालयात न नेता मुलाला तासभर शाळेत बसवून ठेवल्याचा पालकांचा आरोप

Ulhasnagar School News : उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील भरत नगरमध्ये राहणाऱ्या आम्रपाली राजेश इंगळे यांचा ९ वर्षांचा मुलगा अर्णव हा गुरुनानक शाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : कॉम्प्युटरच्या तासाला जात असताना पाय घसरून पडल्याने एका विद्यार्थ्याचा पडून हात मोडल्याची घटना उल्हासनगरात घडली. मात्र यानंतर देखील शाळेने मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी पालक शाळेत येईपर्यंत तासभर शाळेतच बसवून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी पालकांनी शाळेच्या बालकल्याण समितीकडे तक्रारही केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील भरत नगरमध्ये राहणाऱ्या आम्रपाली राजेश इंगळे यांचा ९ वर्षांचा मुलगा अर्णव हा गुरुनानक शाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अर्णव हा वर्गातून कॉम्प्युटरच्या तासाला जात असताना पाय घसरून पडला आणि त्याच्या हाताचे हाड मोडले. यामुळे विद्यार्थी रडत होता. याबाबत शाळेने अर्णवच्या पालकांना कळवलं.  

मात्र यावेळेस त्याचे पालक आम्रपाली आणि राजेश इंगळे हे कामावर गेलेले असल्याने त्यांना शाळेत पोहोचायला तासाभराचा अवधी गेला. या दरम्यान शाळा प्रशासनाने अर्णवला तातडीने रुग्णालयात न नेता पालकांची वाट बघत मुख्याध्यापकांच्या खोलीत बसवून ठेवण्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. यानंतर शाळेत पालक आल्यानंतर त्यांनी मुलाला जवळच्या खासगी रुग्णालयात नेत त्याच्यावर उपचार करून घेतले. 

बालकल्याण समितीकडे तक्रार 

या सगळ्यानंतर शाळा प्रशासनाने अर्णव वर तातडीने उपचार सुरू करण्याची गरज होती. मात्र त्याला तासभर शाळेतच बसवून ठेवण्यात आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत शाळेविरोधात बालकल्याण समिती आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती अर्णवची आई आम्रपाली इंगळे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Saree Draping : डाव्या की उजव्या? साडीचा पदर कोणत्या बाजूला काढावा? जाणून घ्या

Maharashtra Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात ८१०० पोलिसांची भरती, अनेकांचे पोलिस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण

महावितरणचा मोठा झटका! वीज बिल थकलं तर घरात लगेच अंधार; नव्या नियमाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT