Solapur Crime : प्रेमविवाहाचा हृदयद्रावक शेवट, कौटुंबिक वादातून पत्नीने पतीचा केला खून

Solapur News : धुळप्पाचा दुचाकीवरून पडून अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा हात खुब्यातून निखळला होता. त्यामुळे धुळप्पा कडून रोजचे काम होत नव्हते. यामुळे कौटुंबिक अडचणी वाढल्याने पती- पत्नीमध्ये वारंवार खटके उडत
Solapur Crime
Solapur CrimeSaam tv
Published On

सोलापूर : पती- पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे भांडण होत होते. यातच कौटुंबिक भांडणातूनच पत्नीने आपल्या पतीला लाकडाच्या दांड्याने मारहाण करत पतीचा खून केला. ही धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर मधील तांदुळवाडीत घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

धुळप्पा हेले असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे. धुळप्पा हेले हा वाहन चालक होता. धुळप्पा आणि प्रगती यांचा १० वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. त्यांना दोन मुली असून त्या शिक्षण घेत आहेत. तर अडीच महिन्यांपूर्वी धुळप्पाचा दुचाकीवरून पडून अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा हात खुब्यातून निखळला होता. त्यामुळे धुळप्पा कडून रोजचे काम होत नव्हते. यामुळे कौटुंबिक अडचणी वाढल्याने पती- पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते.

Solapur Crime
Bhandara Accident News : भरधाव ट्रकने शाळकरी मुलाला चिरडले; मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले, दोनजण गंभीर

अशातच घरातील सर्व सदस्य एका लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते. याच वेळी पुन्हा पती- पत्नीमध्ये वाद सुरु झाला. दोघांमध्ये जोरदार भांडण होत असताना यामध्ये पत्नीने टोकाची भूमिका घेत पतीच्या डोक्यात लाकडाने मारहाण केली. डोक्याला जोरदार मार लागल्याने धुळप्पा हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. धुळप्पा याला सोलापूर सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच धुळप्पा मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

Solapur Crime
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस; शेतपिकांचे मोठं नुकसान, द्राक्ष बागातदारांना फटका

दरम्यान पत्नी प्रगती हेले हिने लाकडाने मारून पतीचा खून केला. त्यानंतर स्वतःच पत्नी प्रगतीने पोलिसांना फोन करून पतीचा खून केल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन प्रगती हेले हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com