शुभम देशमुख
भंडारा : भंडारा जिल्ह्यात मागील आठवडाभरात सात ते आठ अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यातच आज दोन अपघात झाले आहे. यात भरधाव ट्रकने दिल्याने दुचाकीस्वार शाळकरी मुलाला चिरडले आहे. तर अन्य एका अपघातात मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटून अपघात झाला आहे. यामध्ये १५ मजूर जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत.
भंडाऱ्याच्या बीड- सितेपार मार्गावर एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वार शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात करण रणवीर बांते (वय १८) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो आपल्या ताईला सातोना येथे सोडून परतत असताना हा अपघात झाला. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत ट्रकला घेराव करत अडवून ठेवले. दरम्यान भरधाव ट्रकने त्याला चिरडले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून परिसरातील नागरिकांनी रस्ता अडवून ठेवत आक्रोश व्यक्त केला. वरठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले.
वाहन उलटून १५ मजूर जखमी
भंडाराच्या करडी येथे मजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन पलटून भिषण अपघात झाला. यामध्ये १५ मजुर जखमी झाले असून दोघे गंभीर आहेत. जखमी पैकी काहींना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून भंडारा जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आठवडाभरात अनेक अपघात
भंडारा जिल्ह्यात मागील आठवड्याभरातच अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये मोहाडी, एलोरा पेपर मिल, वैनगंगा नदी पूल, बीड अशा अनेक ठिकाणी अवैध, जड व भरधाव वाहनांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात आज पुन्हा दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.