Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस; शेतपिकांचे मोठं नुकसान, द्राक्ष बागातदारांना फटका

Rain Update : राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. यात नाशिकच्या येवला, निफाड, तालुक्यातील काही भागामध्ये रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाच मोठे नुकसान झाले आहे
Maharashtra Rain
Maharashtra RainSaam tv
Published On

Maharashtra Rain : दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळाने थैमान घातले आहे. याचा परिणाम राज्यात पाहण्यास मिळत असून मागील तीन- चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर काही भागात पावसाचे देखील आगमन झाले आहे. नाशिक, बीड, जालना, निफाड या परिसरात झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अर्थात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. यात नाशिकच्या येवला, निफाड, तालुक्यातील काही भागामध्ये रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाच मोठे नुकसान झाले आहे. येवल्यातील पारेगाव या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी जनार्दन कोराळे यांच्या शेतात लागणीसाठी आलेले कांदा रोप जोरदार पावसामुळे झोपले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे मोठा संकट निर्माण झाले असून त्यांना पुन्हा उन्हाळी कांदा रोप तयार करावी लागणार आहे.

Maharashtra Rain
Gadchiroli News: पोषण आहारातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा, गडचिरोलीच्या जिल्हा परिषद शाळेतील घटना

जालन्यात पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका

जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अवकाळी रिमझिम पाऊस बरसत आहे. या पावसाचा जालन्यातील कडवंची, नाव्हा, धारकल्याण या परिसरामध्ये द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बागांवर डावनी, कुज, भुरी यासह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान आज जालनाच्या तहसीलदार छाया पवार यांनी शेतात जाऊन पाहणी केली. मात्र कृषी विभागांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

Maharashtra Rain
Bhandara Accident News : भरधाव ट्रकने शाळकरी मुलाला चिरडले; मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले, दोनजण गंभीर

बीडमध्ये अवकाळी पावसाने पिकांना फटका
बीडमध्ये आज सकाळपासूनच अवकाळी हलक्याशा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झालं असून शेतकऱ्यांच्या पिकांना देखील फटका बसणार आहे. शेतातील काढायला आलेली तूर, हरभरा यासह आंब्याला नव्याने फुटणाऱ्या मोहरावर देखील याचा परिणाम होणार असून यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास काहीसा हिरावण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com