Gadchiroli News: पोषण आहारातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा, गडचिरोलीच्या जिल्हा परिषद शाळेतील घटना

80 Students Poisoned by Nutritious Food: गडचिरोलीमध्ये ८० विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. सावली तालुक्यातील पारडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये ही घटना घडली.
Gadchiroli News
80 students poisoned by nutritious food Saam Tv
Published On

संजय तुमराम, गडचिरोली

गडचिरोलीमध्ये पोषण आहारातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. गडचिरोलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ही घटना घडली. विद्यार्थ्यांना खायला दिलेल्या चण्यातून ही विषबाधा झाली. त्यांना उलट्या, अतिसार आणि तापाचा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीच्या सावली तालुक्यामध्ये घडली. पारडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाला. ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व विषबाधीत विद्यार्थ्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gadchiroli News
Gadchiroli News: गडचिरोलीत पोलिसांनी कट उधळला, पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ बॉम्बस्फोट

पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये १३३ पटसंख्या असून गुरूवारी घटनेच्या दिवशी १२६ विद्यार्थी हजर होते. शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उकडलेले चणे तिखट आणि मीठ लावून दिलेले होते. पण हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना रात्री उलट्या, अतिसार आणि ताप येणे सुरु झाले.

Gadchiroli News
Gadchiroli News : गडचिरोलीत मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांचा जंगलातून पायी प्रवास; नक्षल कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट

विद्यार्थी शाळेत आल्यावर देखील त्यांना उलटया होऊ लागल्या त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विषबाधा झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सावली येथे तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करुन विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत असले तरी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे. जागेअभावी २५ विद्यार्थ्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

Gadchiroli News
Gadchiroli: गडचिरोलीमध्ये नदीत चार मुले बुडाली; आईने तिघांचे वाचवले प्राण, एकाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com