Gadchiroli News : गडचिरोलीत मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांचा जंगलातून पायी प्रवास; नक्षल कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट

Gadchiroli News : उद्या प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबविली जात असल्याने आज प्रशासनाकडून मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करत रवाना केले जात आहे.
Gadchiroli News
Gadchiroli NewsSaam tv
Published On

मंगेश भांडेकर
गडचिरोली
: विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने गडचिरोली नक्षल कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा हायअलर्टवर असून सुरक्षेच्या दृष्टीने मोठे खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे मतदानासाठीचे साहित्य घेऊन कर्मचारी जंगलातून पायी प्रवास करत केंद्रांवर पोहचत आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) रणधुमाळीत मागील महिनाभरापासून प्रशासनाची जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवार आपल्या प्रचारात व्यस्त असताना प्रशासनाकडून मात्र मतदान केंद्रावर तयारी केली जात होती. उद्या प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबविली जात असल्याने आज प्रशासनाकडून मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करत रवाना केले जात आहे. सायंकाळपर्यंत हि प्रक्रिया राबवून रात्री मतदान केंद्रांवर नेमलेले सर्व कर्मचारी मुक्कामाला असतील. साहित्य नेण्यासाठी प्रशासनाकडून गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गडचिरोलीत (Gadchiroli) कर्मचाऱ्यांना साहित्य घेऊन पायीच जावे लागत आहे. 

Gadchiroli News
Hingoli News : वंचितच्या उमेदवारावर हल्ला; आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी जमाव पोलीस स्थानकात

३० किमीपर्यंत पायी प्रवास 

गडचिरोली जिल्ह्यातील ९७२ मतदान केंद्रापैकी ४५८ मतदान केंद्रांवर पायी चालत मतदान कर्मचाऱ्यांना पोचवले जात आहे. काही मतदान केंद्र १५ ते २० किलोमीटर तर काही ३० किलोमीटर अंतरावर असून जंगलातून हा प्रवास सुरू झाला आहे. रात्री जंगलातच मतदान पथक मुक्काम करणार असून त्यांच्या भोवती सुरक्षा जवानांचा मोठा गराडा राहणार आहे. अति संवेदनशील मतदान केंद्राकडे मतदान पथक निघाले आहेत. 

Gadchiroli News
Sangli News : विना नंबरची गाडी पकडण्यावरून गोंधळ; पडळकरांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप

पोलीस यंत्र हायअलर्ट 

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी कारवायांसाठी ओळखला जातो. दरम्यान विधानसभा निवडणूक असल्याने काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा हायअलर्ट आहे. साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत पोलीस व सुरक्षा दलाचे जवान देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com