हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. या घटनेनंतर समर्थक व कार्यकर्त्यांचा जमाव कळमनुरी पोलीस स्थानकासमोर येत आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंगोलीच्या (Hingoli News) कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर रात्री अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करत त्यांच्यावर हल्ला करत त्यांची गाडी फोडली होती. या हल्ल्यात मस्के हे जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र आता मस्के यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा म्हणत कळमनुरी पोलीस (Police) स्थानकात मोठा जमाव जमला आहे.
पोलीस स्थानकासमोर गोंधळ
डॉ. दिलीप म्हस्के यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते व समर्थक आक्रमक झाले आहेत. कळमनुरी पोलीस स्थानकाच्या पुढे मोठा जमाव असून हल्ला करणाऱ्या आरोपींना गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.