Ulhasnagar Police Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Police : नियम मोडायचा 'डुप्लिकेट', दंड व्हायचा 'ओरिजनल'ला; उल्हासनगरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा पकडल्या

Ulhasnagar News : गेल्या काही दिवसात वाहतुकीचे कोणतेही नियम मोडलेले नसतानाही ई चलानद्वारे दंड लागल्याच्या तक्रारी अनेक वाहन चालकांनी वाहतुक पोलिसांकडे केल्या होत्या. यामुळे नेमका प्रकार समोर आला आहे

अजय दुधाणे

उल्हासनगर : रिक्षाला खोटा नंबर लावून प्रवाशी वाहतूक केली जात होती. अर्थात नियम मोडला तरी दंड वाचविण्यासाठी हा खोटा नंबर वापरला जात होता. वाहतूक पोलिसांनी उल्हासनगरात एकाच नंबरच्या २ रिक्षा पकडल्या आहेत. यातला १ नंबर ओरिजनल तर दुसरा डुप्लिकेट आहे. आपल्याला दंड होऊ नये, म्हणून डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली संबंधित रिक्षा चालकाने दिली आहे.

वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या नंबर प्लेटचा फोटो काढतात. यानंतर थेट मोबाईलवर दंडाची पावती येते. अर्थात वाहनाचा नंबर घेताना तुम्ही आरटीओला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर देता, त्यावर ही पावती येते. परंतु गेल्या काही दिवसात वाहतुकीचे कोणतेही नियम मोडलेले नसतानाही ई चलानद्वारे दंड लागल्याच्या तक्रारी अनेक वाहन चालकांनी वाहतुक पोलिसांकडे केल्या होत्या. यामुळे नेमका प्रकार समोर आला आहे.

तपासणी सुरु असताना त्याच नंबरची आली रिक्षा 

खोट्या नंबरप्लेट लावून काही वाहनचालक नियम मोडतात. दंड मात्र खऱ्या वाहन चालकांना लागत असल्याच्या बाबी यातून पुढे आल्या होत्या. त्यामुळे डुप्लिकेट नंबरवर लक्ष ठेवण्याच्या सूचना उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भामरे यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने उल्हासनगरच्या फॉलोवर लेन चौकात एका रिक्षाची तपासणी सुरू असताना योगायोगाने त्याच नंबरची दुसरी रिक्षा तिथे आली. 

डुप्लिकेट नंबरची रिक्षा ताब्यात

पोलिसांनी दोन्ही रिक्षांचे नंबर तपासले असता एक नंबर ओरिजनल, तर दुसरा डुप्लिकेट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यातला ओरिजनल नंबर डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांचा होता. तर डुप्लिकेट नंबर माणेरे गावातल्या सुनील पाटील याचा असल्याचे समोर आलं. आपल्याला दंड होऊ नये, यासाठी खोटी नंबरप्लेट लावल्याचं सुनील पाटीलने सांगितलं. तर आपल्याला मागील काही दिवसात काहीही कारण नसताना ४ ते ५ हजारांचा दंड आल्याचं डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांनी सांगितलं. त्यामुळं पोलिसांनी डुप्लिकेट नंबरची रिक्षा ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 24K, 22K आणि 18K चे ताजे दर

Maharashtra News Live Update: ठाण्यातील ब्रम्हांड परिसरात सदनिकेचा काही भाग कोसळला

स्वातंत्र्यदिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याच्या रंगातील 5 रेसिपी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील

Pune : पुण्यात भोंदू बाबाचं किळसवाण कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; मांडीवर बसवलं अन्...

Sri Lanka cricket: श्रीलंकेत क्रिकेट कोचच्या हत्येने खळबळ; खेळाडूंसोबत भांडणानंतर नेमकं काय घडलं? क्रिकेटपटू अटकेत

SCROLL FOR NEXT