Sand Mafia : जालन्यात वाळू माफियाचा हैदोस; महसूल पथकावर दगडफेक, मंडळ अधिकारी गंभीर जखमी

Jalna News : चोरटी वाहतूक रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. मुळात नदीतून वाळूचा उपसा करून वाहतूक करण्यावर बंदी आहे. बंदी असताना देखील रात्रीच्या वेळी वाळू उपसा करत वाहतूक केली जात असते
Sand Mafia
Sand MafiaSaam tv
Published On

अक्षय शिंदे 

जालना : वाळू वाहतूकीवर बंदी असताना चोरटी वाहतूक सुरूच असते. अर्थात वाळू माफियांचा हैदोस सर्वत्र सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. जालन्यात देखील वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा पाहण्यास मिळाली असून वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांकडून चक्क दगडफेक आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेत मंडळ अधिकारी जखमी झाले आहेत. 

चोरटी वाहतूक रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. मुळात नदीतून वाळूचा उपसा करून वाळू वाहतूक करण्यावर बंदी करण्यात आलेली आहे. हि बंदी असताना देखील रात्रीच्या वेळी वाळू उपसा सर्रासपणे करत त्याची वाहतूक केली जात असते. हि वाळू वाहतूक रोखण्यासाठी जाणाऱ्या पथकावर हल्ला केला जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. असाच प्रकार जालना जिल्ह्यात देखील समोर आला आहे. 

Sand Mafia
Pandharpur Maghi Yatra : माघ यात्रेसाठी अडीच लाख भाविक पंढरपुरात दाखल; पदस्पर्श दर्शनासाठी भलीमोठी रांग

डंपर रोखताच केली दगडफेक 
जालन्यात वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळत आहे. यात वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी दगडफेक आणि मारहाण केल्याचे समोर आले आहे. जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील दैठणा बुद्रुक गावात काल रात्री सदरची घटना घडली आहे. रात्री वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ती रोखण्यासाठी पथक रवाना झाले. पथकाने वाळूचे डंपर रोखल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. 

Sand Mafia
Wardha Nafed Center : नाफेडची सोयाबीन खरेदी बंद; २२ कोटी ९० लाख रुपयाचे चुकारे नाफेडकडे थकीत

मंडळ अधिकारी जखमी 

पथकावर झालेल्या दगडफेकीत मंडळ अधिकारी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या जालन्यातील अंबड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पी. डी .शिंदे असं या दगडफेकीत जखमी झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com