Ulhasnagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime News: धक्कादायक! वाढदिवसाला केक कापायला आला नाही; रागाच्या भरात दोघांनी मित्राला संपवलं

Ulhasnagar Crime News: वाढदिवसाला केक कापायला न आल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime :

उल्हासनगरमध्ये तरुणाचा त्याच्या मित्रानंच घात केला. वाढदिवसाला केक कापायला आला नाही म्हणून रागाच्या भरात मित्रानेच त्याची हत्या केली. तरुणावर मित्राने चाकूने सपासप वार केले. यात तो जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. १३ दिवसांनी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. (Latest Marathi News)

उल्हासनगरमधील खेमानी परिसरातील देशमुख नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. प्रदीप असं मृत तरुणाचं नाव आहे. जेवण करून फेरफटका मारण्यासाठी तो घराबाहेर निघाला होता. त्यावेळी घात लावून बसलेल्या मित्रांनी त्याच्यावर चाकूचे वार केले. यात तो गंभीर जखमी झाला.

प्रदीपला जखमी अवस्थेत उल्हासनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली. १३ दिवसांनंतर म्हणजेच आज, मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. या घटनेमुळं परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाले आहे.

त्या दिवशी भयंकर घडलं...

प्रदीपच्या दोन्ही मित्रांचा वाढदिवस होता. त्याचं सेलिब्रेशन चौकात करण्यात आलं. सर्व मित्र जमले आणि त्यांनी केक कापला. पण वाढदिवसाचा केक कापायला प्रदीप आला नव्हता. ही गोष्ट दोघांनाही खटकली. रागाच्या भरात या दोघांनी प्रदीपच्या पोटात चाकू भोसकला. यात तो गंभीर जखमी झाला होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितलं.

घटनेतील आरोपी हे अल्पवयीन असून त्यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. इतके दिवस होऊनही पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली नसल्याने प्रदीपचे कुटुंबीय संताप व्यक्त करत आहेत. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि त्याचे अंत्यसंस्कार देखील करणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT