उदगीर रिंग रोड, सीमा भागातील राष्ट्रीय महामार्गाला लवकरच मिळणार मंजूरी twitter/@BansodeSpeaks
महाराष्ट्र

उदगीर रिंग रोड, सीमा भागातील राष्ट्रीय महामार्गाला लवकरच मिळणार मंजूरी

उदगीर रिंग रोड, सीमा भागातील राष्ट्रीय महामार्गाला लवकरच मंजूरी मिळणार आहे. यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर: राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. उदगीर-जळकोट मतदार संघातील विविध रस्ते चौपदरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. (Udgir Ring Road, National Highway in the border area will get approval soon)

हे देखील पहा -

मागील आठवड्यात या संदर्भात मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाला याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रस्तावित मागण्या तात्काळ मंजूर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या बाबतची कार्यवाही त्वरित होणार आहे.
संजय बनसोडे, राज्यमंत्री - सार्वजनिक बांधकाम

उदगीर येथून जाणारे प्रामुख्याने आष्टा मोड ते देगलूर रस्ता, वडगाव काटी ते तेलंगणा बॉर्डरपर्यंत जाणारा रस्ता मंजूर करुन त्याच बरोबर दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा उदगीर ते शिरूर रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यासोबतच उदगीर शहराचा सर्वात महत्त्वाचा असलेला रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावणे, आष्टा मोड ते तिवटग्याळपाटी चौपदरीकरण करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यासोबतच मतदारसंघातील रस्ते विकासासाठी सी. आर. एफ. अंतर्गत निधी उपलब्ध करण्याचीही मागणी केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT