Uddhav Thackeray addressing a public rally in Dharashiv while targeting rebel MP Omraje Nimbalkar over defection. Saam tv
महाराष्ट्र

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Uddhav Thackeray Speech In Dharashiv Controversy: धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीका करत बंडखोर खासदारांवर हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

ऑपरेशन टायगरमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे 9 पैकी 6 खासदार गळाला लावले. या सर्वांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यामध्ये विशेष म्हणजे धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत जोरदार हल्लाबोल केला.

धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी ठाकरे म्हणाले, जेव्हा मी खासदारांची बैठक बोलावली होती. तेव्हा मला यांनी न येण्याची वेगवेगळी करणे दिली होती. तेव्हा मी यांना म्हटलो नका येऊ. मात्र जेव्हा यांचे चेहरे मला व्हिडिओमध्ये दिसायला लागले, तेव्हा मी ओमराजे निंबाळकरांना विचारले, तुमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये. तुम्हाला काही टेंशन आहे का? की रात्री झोप झालेली नाहीये? तेव्हा ते म्हणाले माझे सगळे बरोबर आहे, मी ठीक आहे, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, वाटले काही तरी गडबड आहे

तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओमराजे निंबाळकर यांना जपण्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत केला. खोटे कशाला सांगू? अगदी खासदार फुटण्याच्या आदल्या रात्री दीड वाजता, मी कैलास पाटील आणि वरून सरदेसाई यांना त्यांना भेटण्यासाठी पाहवले होते, मी त्यांना हे देखील म्हणालो होतो, मला ओमराजे पाहिजे त्यांना खासदार पाहीजे आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : जोडीदारासोबत वाद टाळा; 5 राशींची पैशांची चणचण मिटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

SCROLL FOR NEXT