गिरीश कांबळे, प्रतिनिधी
नांदेड शासकीय रुग्णालयात ३१ बळी गेल्यानंतर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. नांदेड, प्रमाणेच छत्रपती संभाजीनगर, नागपुरमध्येही अशीच प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावरुन शिंदे- फडणवीस- पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सर्वच शासकीय रुग्णालयात रुग्णांचे बळी जात आहेत. मात्र फक्त नांदेडमध्येच (Nanded) डीनवर कारवाई का झाली? ठाण्यामध्ये कारवाई का नाही झाली? असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच रुग्णालयात बळी जात असताना मुख्यमंत्री (Eknath Shinde) दिल्लीत आहेत. ते आणि उपमुख्यमंत्री नांदेडला का गेले नाहीत? एक फुल, एक हाफ दिल्लीत आहेत, दुसरा हाफ कुठे आहे? अशा शब्दात राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
"या सरकारला खोके सरकार म्हणतात. यांच्याकडे गुवाहाटीत जायला, गोव्यात मजामस्ती करायला पैसे आहेत, जाहिरात देण्यासाठी पैसे आहेत, मात्र औषधांसाठी पैसे नाहीत," असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.
"आज मी मुख्यमंत्री नाहीये, मविआ सरकार नाहीये, मात्र आरोग्य व्यवस्था तीच आहे. कोरोना सारख्या संकटाचा सामना याच आरोग्य व्यवस्थेने केला होता. त्याच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे" उद्धव ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.