Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

team india wicketkeeper ks bharat retires from cricket : भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर आणि फलंदाज केएस भरत यानं आज, गुरुवारी (4 जून) आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयानं भारतीय क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भारतीय क्रिकेटपटू केएस भरतची निवृत्तीची घोषणा
ks bharat announces retirement from international and domestic cricketsaam tv
Published On

भारतीय क्रिकेट संघात २०२३ मध्ये कसोटी संघात पदार्पण करणारा विकेटकीपर-फलंदाज केएस भरत यानं आज, गुरुवारी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याचा या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय क्रिकेटमधील उत्तम विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून भरतची ओळख आहे. केएस भरतला ऋषभ पंतचा बॅकअप विकेटकीपर म्हणून भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलं होतं.

ऋषभ पंत हा कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे तो बरेच महिने भारतीय संघात नव्हता. त्यावेळी केएस भरतला भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तो पहिला कसोटी सामना खेळला होता. २०२४ मध्ये भरत इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळू शकली नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वात पदार्पणाची संधी

ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला होता. त्याच्या जागी केएस भरतला कसोटी संघात संधी देण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात त्यानं भारतीय संघात पदार्पण केलं होतं. भरतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली, मात्र तो आपल्या फलंदाजीनं प्रभावित करू शकला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध झालेल्या फायनलच्या सामन्यातही भरतला खेळण्याची संधी मिळाली होती. त्या संधीचं तो सोनं करू शकला नाही. भरत एकूण ७ कसोटी सामने खेळला. त्यातील १२ डावांत फलंदाजी करताना २०.०९ च्या सरासरीने त्यानं २२१ धावा केल्या होत्या. त्यात एकही अर्धशतक किंवा शतकी खेळी साकारता आली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी

केएस भरत यानं आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो आंध्रच्या संघातून खेळत होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११३ सामन्यांतील १८० डावांत ६१०२ धावा केल्या आहेत. त्यात ११ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये भरतने ८३ सामन्यांत ३६.३७ च्या सरासरीने २६९२ धावा केल्या. ९१ टी २० सामन्यांत १८१२ धावा केल्या आहेत.

भारतीय क्रिकेटपटू केएस भरतची निवृत्तीची घोषणा
Suryakumar Yadav : वर्ल्डकपविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला हटवलं; टी २० संघातही स्थान नाही- रिपोर्ट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com