Shruti Vilas Kadam
जोडवी हा विवाहित महिलांच्या पारंपरिक दागिन्यांपैकी एक महत्त्वाचा दागिना मानला जातो. चांदीच्या जोडवीमुळे पायांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
फुलांच्या नक्षीकामाने सजवलेल्या सिल्व्हर जोडव्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या डिझाइन्स पारंपरिक आणि एलिगंट लूक देतात.
ऑक्सिडाइज्ड फिनिश असलेल्या जोडव्या महिलांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहेत. या डिझाइन्स पारंपरिक तसेच इंडो-वेस्टर्न पोशाखांवरही सुंदर दिसतात.
झिरकॉन, अमेरिकन डायमंड किंवा रंगीत स्टोन लावलेल्या जोडव्या अधिक आकर्षक आणि रॉयल लूक देतात.
साध्या आणि हलक्या वजनाच्या सिल्व्हर जोडव्या रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहेत. त्या आरामदायी आणि टिकाऊ असतात.
लग्न, सण किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी कोरीव नक्षीकाम आणि जाड पट्टीच्या जोडव्या अधिक पसंत केल्या जातात.
सिल्व्हर जोडवी डिझाइन्समध्ये आजकाल आधुनिक ट्रेंडनुसार विविध नमुने उपलब्ध आहेत. त्यामुळे परंपरा जपत स्टायलिश लूक मिळवता येतो.