Shruti Vilas Kadam
दररोज 30 ते 45 मिनिटे वेगाने चालल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते. हा सर्वात सोपा आणि सुरक्षित व्यायाम मानला जातो.
प्लँक केल्याने पोट, पाठ आणि खांद्यांचे स्नायू मजबूत होतात. सुरुवातीला 20 ते 30 सेकंद प्लँक धरून ठेवण्याचा प्रयत्न करा.
हा व्यायाम संपूर्ण शरीराला सक्रिय ठेवतो आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
सायकल क्रंचेसमुळे पोटाच्या स्नायूंवर चांगला ताण येतो. नियमित सराव केल्यास कोअर स्ट्रेंथ वाढण्यास मदत होते.
पाठीवर झोपून दोन्ही पाय वर उचलण्याचा हा व्यायाम खालच्या पोटावरील स्नायूंना सक्रिय करतो आणि पोट टोन करण्यास मदत करतो.
जंपिंग जॅक्स हा एक उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते.
फक्त व्यायाम पुरेसा नसतो. संतुलित आहार, पुरेसे पाणी, चांगली झोप आणि नियमित दिनचर्या यामुळे पोटावरील चरबी कमी करण्याचे प्रयत्न अधिक प्रभावी ठरतात.