Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : केरळमध्ये आज मान्सूनचे आगमन, विधान परिषद निवडणुका, राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ अन् विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

जगाला सध्या भारताची आवश्यकता आहे- मोहन भागवत

जगाला सध्या भारताची आवश्यकता आहे. कारण या सगळ्यांना जोडणारं तत्त्व फक्त भारताजवळ आहे, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.

Ahilyanagar : अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध 

अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे.

आमदार संग्राम जगताप हे अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल..

रात्री आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देऊन तक्रार नसल्याचा खुलासा केल्या नंतर पेच सुटला.

अखेर महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपूरे बिनविरोध

pune : पुण्यातील निंभोरा स्टेशनवर रेल्वे २ तासांपासून खोळंबल्या

निंभोरा स्टेशनवर रेल्वे दोन तासापासून खोळंबल्या आहेत.

निंभोरा परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने रेल्वे पटरी वरती झाड पडली आहेत झाडं बाजूला काढण्याचे काम सुरू

baramati : बारामतीत पोलिसांना सापडलं मृतावस्थेतील अर्भक

बारामतीतील आमराई परिसरात पोलिसांना सापडलं मृतावस्थेत अर्भक

पोलीस अर्भक घेऊन सरकारी रुग्णालयात दाखल

अर्भक कुणी टाकलं याची माहिती नाही

पोलीस अधिक तपास करीत आहेत

पोलिसांना देखील या घटनेची अधिक माहिती नाही

pune : नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील नागरगाव परिसरात नदीकाठच्या शेतांना वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर अचानक जळून खाक

अनेक शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था ठप्प

पिकांच्या नुकसानीची भीती निर्माण

Aniket tatkare :  हा विजय अजितदादांना समर्पित, अजितदादांच्या धेय्यधोरणांवर काम करणार - अनिकेत तटकरे 

विधान परिषदेचा विजय अजितदादांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आहे. अजितदादांच्या धेय्य धोरणांवर, विचारांवर चालणार असल्याच सांगताना अजितदादांचं कोकणावर विषेश प्रेम होतं, त्याला अनुसरून जे जे काही चांगलं असेल ते कोकणात आणण्यासाठी प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया अनिकेत तटकरे यांनी दिली आहे.

Nanded : विधानपरिषद निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी कायम

काँग्रेसचा उमेदवार असेल तर पाठिंबा द्या अन्यथा विधानपरिषदेची ही निवडणूक लढा, असा प्रकाश आंबेडकरांचा आदेश असल्याचे वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी माहिती दिली. ते नांदेडमध्ये बोलत होते.

Nashik : आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकूल बांधकाम 

नाशिकच्या येवला तालुक्यातील सावरगाव येथे एका गरीब आदिवासी समाजातील कुटुंबाच्या मालकीच्या खाजगी जागेवर संगनमताने बेकायदेशीरपणे शासकीय घरकूल योजनेचे बांधकाम करून जागा हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित आदिवासी बांधव नवनाथ सखाहारी लोखंडे यांच्या पाठीशी एकलव्य संघटना खंबीरपणे उभी राहिली आहे. प्रशासनाच्या अन्यायाविरोधात येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

matin Patel : एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची चार तासांपासून चौकशी

एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची चार तासांपासून चौकशी

आज पुन्हा जाब जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू

मतीन पटेलची आज तिसऱ्यांदा एसआयटीकडून केली जाते आहे चौकशी

मतीन पटेलच्या मोबाईल डेटाच्या अनुषंगाने केली जात आहे चौकशी

अनिकेत तटकरेंचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा, कार्यकर्त्यांचा जल्लोष

अनिकेत तटकरेंचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. सुनील तटकरेंचे होमग्राउंड असलेल्या रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष साजरा केला आहे

राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

राज्यसभेच्या संभाव्य रिक्त होणाऱ्या जागेच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज पुन्हा मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कालही रवी राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

चाकणमध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; 251 सिलेंडर जप्त

पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी चाकण परिसरात डोमेस्टिक एलपीजी गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारे रॅकेट उध्वस्त केले आहे. मालमत्ता विरोधी गुन्हे पथकाने मार्केट यार्डजवळील बालाजी गॅस एजन्सीवर छापा टाकून बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत एजन्सी मालक शुभम परदेशी व दोन कामगारांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी 251 एलपीजी सिलेंडर, रिफिलिंग साहित्य आणि महिंद्रा टेम्पोसह एकूण 9.71 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गडचिरोली प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मानेंच्या हकालपट्टीनंतर पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. गडचिरोलीतील मायानिंग प्रकल्पाला स्थानिक गावकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे सांगत हा प्रकल्प अत्यंत धोकादायक असल्याचा दावा त्यांनी केला. काही उद्योगपतींना लाभ मिळवून देण्यासाठी प्रकल्प मंजुरीची स्पर्धा सुरू असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

Kolhapur: कॅसिनो व्हिडिओवरून क्षीरसागर पिता-पुत्रांवर टीका

कॅसिनो व्हिडिओवरून क्षीरसागर पिता-पुत्रांवर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र तसेच नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी त्यांनी ऋतुराज क्षीरसागर हे एका कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा दावा करत संबंधित व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर केला.

Palghar: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

पालघर -

तलासरीतील धानोरी परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे.

भरधाव ट्रक नियंत्रण सुटून थेट एका घरात घुसल्याची घटना आज घडली.

सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

Akola: अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहारचे ठिय्या आंदोलन

अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहारचे ठिय्या आंदोलन.

आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलेय.

4 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीच्या भरपाईसह शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले गेलेय.

Jalgaon: जळगाव विधान विधान परिषद निवडणुकीत 16 पैकी 12 उमेदवारांनी घेतली माघार

जळगाव -

जळगाव विधान विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या 16 पैकी 12 उमेदवारांनी घेतली माघार

जळगाव विधान परिषदेसाठी आता 4 उमेदवार रिंगणात

महायुती भाजपचे नंदकिशोर महाजन

महाविकास आघाडी ठाकरे गटाचे शरद तायडे

शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे

अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात

Ahilyanagar: अहिल्यानगरला विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचं ठिय्या आंदोलन

अहिल्यानगर -

अहिल्यानगरला विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचं ठिय्या आंदोलन

जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू

जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणावर उठणार नाही

जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाची परिस्थिती

Ashok Chavan: राज्यातल्या 17 जागांवर महायुतीचा उमेदवारच निवडून येणार - अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण -

महायुतीमध्ये नांदेडची जागा ही भाजपला सुटली आहे.

त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवाराला घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

आम्ही तिन्ही घटक पक्ष मिळवून राज्यामधल्या 17 च्या 17 जागा विजय होतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

तिन्ही पक्षाचं असं मजबूत वातावरण निर्माण झाल्यामुळे राज्यातल्या 17 जागा महायुतीच्या निवडून येणार आहेत.

जलसाठे पुनर्जीवित करण्यासाठी धरणांमधील गाळ काढण्याच्या कामाला वेग

साक्री तालुक्यातील लहान-मोठी धरणे, बंधारे तसेच दुर्गम दऱ्याखोऱ्यातील जलसाठे पुनर्जीवित करण्यासाठी आमदार मंजुळा गावीत यांच्या प्रयत्नांतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्या नंतर आता प्रत्यक्षामध्ये साक्री तालुक्यातील या सर्व जलसाठ्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे, आमदार मंजुळाताई गावीत यांच्या हस्ते लाठीपाडा व मांजरी परिसरातील मधकुपीपाडा येथील धरणातील गाळ काढण्याच्या महत्त्वाकांक्षी कामाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले आहे,

Bal Mane Shivsena : बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर वानराचा कब्जा

सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीतून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मंत्री शंभूराज देसाई हे जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर कार्यालयाच्या पोर्चमध्ये थांबवलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर मात्र वानराने कब्जा केला. मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनासोबत असणाऱ्या पोलिसांनी वानराला हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु दहा ते पंधरा मिनिटं वानराने मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनाचा ताबा सोडला नाही

आळंदी मंदिर चोरीप्रकरणी कारवाई; एकाची हाकलपट्टी, दोघे निलंबित

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने मंदिरातील चोरीप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. २२ मे रोजी घडलेल्या घटनेनंतर कर्मचाऱ्यांचे खुलासे मागवण्यात आले होते. त्यानंतर २९ मे रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एका हंगामी सेवकाची सेवा समाप्त करण्यात आली. तसेच रोखपाल आणि आचारी यांना आरोपी विशाल वारुळे याची पोलिस चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय व्यवस्थापकांना सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती संस्थान समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अनिकेत तटकरे यांची जवळजवळ बिनविरोध निवड

अनिकेत तटकरे यांची जवळजवळ बिनविरोध निवड

मंत्री भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया

गोगावलेंकडून अनिकेत तटकरे यांना शुभेच्छा

सोलापूर विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दीड तास आधीच तीन जणांनी घेतली माघार

सोलापूर विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दीड तास आधीच तीन जणांनी घेतली माघार

धनंजय डिकोळे, रमेश बारस्कर, महेश साठे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी पोचले.

पुणे विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध

पुणे विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध

पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील हे देखील माघार घेणार

विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

पक्षाने आदेश दिल्याने माघार घेत असल्याच श्रिकांत पाटील यांचं म्हणणं

काल दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटल्यानंतर झालेली महत्वाची घडामोड

नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम.

नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस

दमदार पावसामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा

यवतमाळमध्ये राष्ट्रवादी बंडखोर साजिद बेग यांची निवडणुकीतून माघार

यवतमाळ विधान परिषद निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर साजिद बेग यांची निवडणूकितून माघार

महायुतीचा उमेदवारांचा विजय सुकर व्हावा म्हणून माघार घेत असल्याचे सांगितले

वरीष्ठ नेत्यानी उमेदवारी दाखल करायला सांगितले होते आता महायुतीची उमेदवारी जाहीर झाली

त्यामुळे आता युतीच्या उमेदवार सोबत राहणार असल्याचे सांगितले

राष्ट्रवादी बंडखोर नगरसेवक साजिद बेग यांनी माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची नाशिकमध्ये बैठक सुरू

- गणेश गीते यांच्यासोबत शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे मंत्री दादा भुसे सुहास कांदे यांची बैठक सुरू

- नाशिकच्या हॉटेल 4 पॉईंट मध्ये राजकीय खलबत सुरू

परभणीत मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परभणी मध्ये महायुतीची बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घ्यावे अशी मत दिसते केली होती या मध्यस्थीनंतर अखेर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विजय जानकर आणि संग्राम जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे

डोंबिवलीतील मिलापनगर तलावात हजारो मासे मृतावस्थेत

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील मिलापनगर तलाव येथे गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मृतावस्थेत आढळून येत आहेत. तलावातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात मासे तरंगताना दिसत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

परभणीत राष्ट्रवादीचे संग्राम जामकर, विजय जामकर, भाजपचे विश्वजीत बुधवंत उमेदवारी अर्ज घेणार मागे

परभणीतील महाग महायुती मधील बंडखोरी समली संग्राम जामकर विजय जामकर विश्वजीत बुधवंत उमेदवारी अर्ज मागे घेणार उदय सामंत यांनी माहितीच्या पत्रकार परिषदेत केली.

घोषणा परभणीच्या उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर राजपा आमदार रत्नाकर गुट्टे पालकमंत्री मेघना बोर्डीकर हे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीची नाराजी उदय सामान त्यांनी दूर केली त्यामुळे संग्राम जामकर विजय जामकर आणि भाजपचे विश्वजीत बुधवंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले

रायगडच्या निजामपुरमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा

रायगडच्या निजामपुरमध्ये ग्रामस्थांना दुषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नळपाणी पुरवठा योजने मार्फत केल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये माती आणि जंतू आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये आरोग्याची चिता निर्माण झाली आहे. निजामपुरमध्ये काळ नदी पात्रातुन पाणी पुरवठा केला जातो.

छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीत खळबळ

अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरात छेडछाडीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय प्रज्वल खरे याची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

कराडच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर कराड जवळ साडेतीन किलोमीटरचा भव्य उड्डाणपूल उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे पुलाचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे

यंदाच्या पावसाळ्या पुर्वी पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे

115 पिलरवर खांबावर उभारलेल्या या भव्य पुलाची लांबी 3.47 किलोमीटर आहे रूंदी 29.5 मीटर आहे

बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बीड च्या गेवराई शहरातील 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीसआली आहे. या प्रकरणी मृत विवाहिते च्या माहेरच्यांनी पती, सासू-सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंड्यासाठी व पैशांच्या मागणीमुळे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार?

पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव

यंदा पाऊस कमी पडणार असल्याच्या अंदाजाने खबरदारीचा उपाय म्हणून आयुक्तांकडे दिला प्रस्ताव

या प्रस्तावावर पुणे महापालिका काय निर्णय घेणार याकडे लक्ष

लोकप्रतिनिधी ने 31 मे पर्यंत पाणी कपात न करण्याचा घेतला होता निर्णय मात्र जलसंपदा एप्रिलमध्ये पाणी कपात करण्याचे दिले होते निर्देश

पुढील आठवड्यात दिवसाआड पाणी कपात प्रस्तावा वर आयुक्त परवानगी देण्याची शक्यता

जम्मू-काश्मीरमध्ये मोठं अँटी-टेरर ऑपरेशन सुरू

Rajouri येथे सुरक्षा दलांनी मोठी दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे. मंजनकोट सेक्टरमधील गमभिर मुग्लान जंगल परिसरात ही कारवाई सुरू असून, सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी परिसरात कसून शोधमोहीम हाती घेतली असून संभाव्य दहशतवादी हालचालींचा शोध घेतला जात आहे. या ऑपरेशनमुळे संपूर्ण परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. Rajouri भागात सुरक्षा दलांची मोठी तैनाती करण्यात आली असून ऑपरेशन अद्याप सुरूच आहे.

राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने धडक मोहीम

Summary

पुणे जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या हातभट्टीच्या विषारी दारू दुर्घटनेची गंभीर दखल घेत रत्नागिरी जिल्ह्यात अशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. कारवाई सुरू झाल्यापासून आठवडाभरात २९ जणांना अटक करण्यात आली असून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,

राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने धडक मोहीम

पुणे जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या हातभट्टीच्या विषारी दारू दुर्घटनेची गंभीर दखल घेत रत्नागिरी जिल्ह्यात अशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. कारवाई सुरू झाल्यापासून आठवडाभरात २९ जणांना अटक करण्यात आली असून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधील कोट्यवधींच्या दागिने चोरीप्रकरणी आणखी एकाला अटक,१.२७ कोटींचे दागिने जप्त

सोलापूर कल्याण दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या दागिने चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले आहे. या प्रकरणातील दहा आरोपींपैकी तीन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. आता पोलिसांनी पुणेकर उर्फ शिवया डिकोले याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटी 27 लाखांचे बिस्किट जप करण्यात आले आहे. एक व्यवसायिक आपल्या मुलीसोबत दागिने विक्री करण्यासाठी सोलापूरला गेले होते दागिने घेऊन मुंबईला येत असताना सहा महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता.

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

पुण्यात महायुतीकडून विक्रम काकडे तर महाविकास आघाडीकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी

भाजपमधून बंडखोरी करत प्रदीप कंद यांनी भरला आहे अपक्ष अर्ज

पुणे विधान परिषदेचे जागा बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष

अपक्ष उमेदवार प्रदीप कंद माघार घेण्याची शक्यता

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये स्टेट बँकेसमोर कॅश व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाचा गोळीबार

नंदुरबार शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी कॅश व्हॅनमधून रोकड उतरवत असताना सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक मिस फायर झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोळी थेट फरशीवर आदळल्याने फरशीचे तुकडे उडाले. या दुर्घटनेत 43 वर्षीय संजय गायकवाड हे जखमी झाले असून, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. गेल्या दोन आठवड्यांत जिल्ह्यात घडलेल्या बंदुकीच्या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com