Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदही घ्यावे; शिवसेना नेत्याची मागणी

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्रीपद देखील घ्यावे, त्यामुळे महाराष्ट्राला चांगली दिशा मिळेल मिळेल, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : सध्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे सध्याचे गृहमंत्री कठोर कारवाई करत नसल्याने त्यांच्यावरती शिवसेना आणि काँग्रेस (Shivsena And Congress) नेत्यांची नाराजी असल्याच्या चर्चा कालच्या मंत्रीमंडळ बैठकीपासून सुरु आहेत.

याच पार्श्वभूमिवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली या भेटीनंतर गृहमंत्री उत्तम काम करत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांची पाठराखण केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र, गृहखात्यावरून सुरू असलेल्या धुसफूशीवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे ते म्हणाले, माध्यमांवरती येत असलेल्या बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र सेनेचे वरिष्ठनेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच गृहमंत्रीपद देखील घ्यावे, त्यामुळे महाराष्ट्राला चांगली दिशा मिळेल मिळेल, अशी मागणी शिवसेनेचे केल्याने आता आणखी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

तर दुसरीकडे सार्वजनिक कार्यक्रमात तलवार काढली म्हणून गुन्हे दाखल करणे योग्य नसल्यातचं म्हणत मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी देखील गृहमंत्र्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT