Operation Tiger, Shiv Sena Split 
महाराष्ट्र

Operation Tiger : ठाकरेंचे 'ते' २ खासदार फुटायला तयारच नव्हते; दिग्गज नेत्यानं खेळला मास्टरस्ट्रोक अन् स्क्रिप्ट बदलली

Operation Tiger, Shiv Sena Split : मागील ५ वर्षांत उद्धव ठाकरेंचा पक्ष २ वेळा फुटला आहे. आता ठाकरेंना ६ खासदार सोडून जात आहेत. त्याशिवाय आमदार आणि नगरसेवकही साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे.

Namdeo Kumbhar

Operation Tiger Uddhav Thackeray Eknath Shinde : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम राहिलेला नाही. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. पुढील काही दिवसांत हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरेंचे 'ते' दोन खासदार कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडायला किंवा बंड करायला तयार नव्हते. मात्र, ऐनवेळी एका दिग्गज नेत्याने अशी काही चाल खेळली की संपूर्ण स्क्रिप्टच बदलून गेली. या दोन्ही खासदारांचे मन वळवण्यात या नेत्याला कसे यश आले आणि त्यांनी खेळलेला तो 'मास्टरस्ट्रोक' नेमका काय होता? पाहूयात यामागील संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'...

ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण ९ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार (Anti-Defection Law) कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आणि अपात्रता रोखण्यासाठी किमान दोन-तृतीयांश म्हणजेच ६ खासदारांची आवश्यकता असते. याच ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र दिल्याची आणि शिंदे गटात विलीन होण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीला 'ऑपरेशन टायगर' असे नाव देण्यात आले आहे.

फुटलेले ६ खासदार कोणते?

१. संजय जाधव (परभणी)

२. ओमप्रकाश राजेनिंबाळकर (धाराशिव)

३. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

४. संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम)

५. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

६. संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व)

ठाकरेंसोबत राहिलेले खासदार:

१. अरविंद सावंत (मुंबई दक्षिण)

२. अनिल देसाई (मुंबई दक्षिण-मध्य)

३. राजाभाऊ वाजे (नाशिक)

असे आखले 'ऑपरेशन टायगर'

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष दुसऱ्यांदा कसा फोडला? याचे उत्तर आता हळूहळू समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, एकनाथ शिंदे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांनंतरच 'ऑपरेशन टायगर'ची तयारी सुरू केली होती. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, २०२४ पासूनच उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना फोडण्यासाठी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रणनीती आखली होती. संसदेत भाजपला संख्याबळ वाढवण्याची गरज लक्षात आणून देत, शिंदे गटाने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही यात सहभागी करून घेतले.

भाजप नेतृत्वाकडून हिरवा कंदील

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या हालचालींना हिरवा कंदील दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर' वेगाने सक्रिय केले. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यामार्फत ठाकरेंच्या ४ लोकसभा खासदारांना गळाला लावण्यात आले. यामध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश होता. या ४ खासदारांनी एनडीएमध्ये सामील होण्यास सकारात्मक संकेत दिले खरे, पण पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी ६ खासदारांची गरज होती. दोन-तृतीयांश बहुमताची अट पूर्ण करण्यासाठी आणखी दोन खासदारांना सोबत घेणे अनिवार्य होते. त्यासाठी मग धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मुंबईचे संजय दिना पाटील यांची मनधरणी सुरू झाली.

ओमराजे आणि संजय दिना पाटील यांना पटवणे होते सर्वात कठीण

एकनाथ शिंदेंनी ४ खासदार सहज मनवले, पण ओमराजे आणि संजय दिना पाटील या दोघांना सोबत घेणे सोपे नव्हते. धाराशिवचे खासदार ओमराजे हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. मात्र, २०१९ ते २०२२ दरम्यान शिंदे यांच्यासोबत असलेल्या जवळच्या संबंधांमुळे दोन्ही नेत्यांमध्ये सलोखा होता. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ओमराजे तयार झाले. दरम्यान, "ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांच्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) खून प्रकरणाचा निकाल त्यांच्या बाजूने लागेल, असे प्रलोभन त्यांना देण्यात आले," असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

दुसरीकडे, 'लाइव्ह हिंदुस्थान'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील खासदार संजय दिना पाटील पक्ष बदलण्यास अजिबात तयार नव्हते. पण शिंदे गटाकडून त्यांना भावनिक साद घालण्यात आली. पाटील यांच्या पत्नी पल्लवी यांचा जेव्हा अपघात झाला होता, तेव्हा उद्धव गटातील कोणताही बडा नेता त्यांना भेटायला किंवा विचारपूस करायला आला नव्हता, याची आठवण त्यांना करून देण्यात आली. या भावनिक कार्डनंतर अनेक बैठका झाल्या आणि अखेरीस पाटील यांनीही शिंदेंची साथ देण्याचे मान्य केले.

पक्षातील सूत्रांनुसार, या सर्व खासदारांसोबतचा करार निश्चित झाल्यावर त्यांना अंतिम चर्चेसाठी खासगी विमानाने दिल्लीला नेण्यात आले आणि तिथे सर्व प्रक्रिया पूर्ण झाली.

राज्यातील भाजप नेत्यांची धाकधूक

शिवसेना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या खेळीबाबत महाराष्ट्रातील भाजप नेते सुरुवातीला काहीसे साशंक होते. शिंदेंचे राजकीय वजन संसदेत वाढल्यास ते महायुतीमध्ये अधिक जागांची किंवा सत्तेत मोठ्या वाट्याची मागणी करतील, अशी भीती राज्यातील भाजप नेत्यांना वाटत होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या 'ऑपरेशन'ला आधीच मंजुरी दिल्यामुळे अखेर राज्यातील नेत्यांनाही नमते घ्यावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी धर्म संकटात, पाऊल चुकीचे वाटतंय, पण...; ओमराजे निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

Operation Tiger : २१ जूनला राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Maharashtra News Live Update: संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याने काही फरक पडत नाही - भरत गोगावले

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

SCROLL FOR NEXT