Operation Tiger : २१ जूनला राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? असा प्रश्न आहे. मात्र, आता २१ जून २०२२ मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात २१ जूनला राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेचे ६ बंडखोर खासदार २१ जूनला शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. या पक्षप्रवेशाला स्वतः एकनाथ शिंदे हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. २० जूनला लोकसभा अध्यक्षांनी विलिनीकरणाला मान्यता दिल्यानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन टायगर पूर्णत्वास नेण्याची शक्यता आहे. कोणत्याही कायदेशीर पेचात अडकू नये म्हणून शिंदेसेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, २१ जून २०२२ रोजी शिंदेंनी बंड केलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com