Uddhav Thackeray chairs a crucial meeting of Shiv Sena (UBT) MPs at Matoshree amid political speculation. saam tv
महाराष्ट्र

मातोश्रीवर बैठकीला 4 खासदार गैरहजर; कारण काय? संजय राऊत स्पष्टच बोलले, ठाकरे गटात घडामोडींना वेग

Uddhav Thackeray Matoshree Meeting Mps Attendance Reasons: मातोश्रीवरील बैठकीत ठाकरे गटाचे सर्व 9 खासदार उपस्थित होते. काही खासदार ऑफलाइन तर काही ऑनलाइन सहभागी झाले. गैरहजेरीमागील कारणांबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट माहिती दिली.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदे याच्या गटात सामील होण्याच्या चर्चेनंतर आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी सर्व 9 खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला एकूण चार खासदार हे ऑफलाइन उपस्थित होते. तर चार खासदार हे ऑनलाइन उपस्थित होते अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. बैठक संपल्यानंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. त्यापैकी या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि संजय दीनापाटील हे चार खासदार बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते.

तर 5 खासदार हे ऑनलाइन उपस्थित होते. यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांच्या मुलाचा विधानपरिषदेचा प्रचार चालू असल्यामुळे ते मुंबईत येऊ शकले नाही. संजय जाधव आणि उद्धव ठाकरे यांचे फोनवर बोलणे झाले असून ते देखील ऑनलाइन उपस्थित होते. संजय देशमुख यांच्या मुलीचे लग्न असल्याने ते येऊ शकले नाही, आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची पत्नी आजारी असून त्यांना अॅडमिट केले आहे, त्यामुळे ते देखील ऑनलाइन उपस्थित होते.

तसेच धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा हा पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अॅडमिट असल्याने ते देखील ऑनलाइन उपस्थित होते. अशाप्रकारे सर्व 9 खासदार हे बैठकीला उपस्थित होते अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच या बैठकीला आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. तसेच ऑपरेशन टायगरवर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले आम्ही स्वतःच टायगर आहोत, आम्हीच आता ऑपरेशन लांडगा करणार आहोत अशी मिश्किल प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Old Photos: प्राजक्ता माळी १३ वर्षांपूर्वी कशी दिसायची? पाहा अभिनेत्रीचे क्यूट जुने फोटो

Early Cancer Signs in Legs: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात 5 मोठी लक्षणं

Maharashtra News Live Update: लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी

Assembly Elections: पाच राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वाजणार विधानसभा निवडणुकांचं बिगुल; काय आहे सरकार आणि आयोगाचा प्लॅन?

Tushar Deshpande: मुंबई टी-२० लीगच्या अंतिम सामन्यात भर मैदानात राडा; विकेट जाताच गौरव थेट तुषार देशपांडेची नडला, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT