Uddhav Thackeray Group shiv sena mp and mla to join Eknath Shinde Group krupal tumane Big Claim Maharashtra Politics
Uddhav Thackeray Group shiv sena mp and mla to join Eknath Shinde Group krupal tumane Big Claim Maharashtra Politics  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे उर्वरित आमदार, खासदारही फुटणार; शिंदे गटाने आखला नवा प्लान

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Maharashtra Politics Latest News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे, असं शिवसेनेचं खासदार कृपाल तुमाणे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ठाकरे गटातील उर्वरित आमदार आणि खासदारही लवकरच आमच्याकडे येतील असा दावाही त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे १३ खासदार निवडून येणार नाहीत, असा दावा केला होता. मात्र, संजय राऊत यांचा हा दावा खासदार कृपाल तुमाणे यांनी फेटाळून लावला आहे. आमच्या गटाचे सर्वच्या सर्व १३ खासदार विजयी होतील, असा विश्वासही कृपाल तुमाने यांनी केला आहे.

इतकंच नाही तर, उद्धव ठाकरे यांच्या गटातील उरलेले आमदार (Shivsena) आणि खासदार लवकरच आमच्याकडे येतील सर्वकाही शिजलं आहे. काही तांत्रिक बाबींमुळे ते थांबले आहे, असा दावाही खासदार कृपाल तुमाणे यांनी केला आहे. (Maharashtra Political News)

'ठाकरे गटाचे उर्वरित आमदार, खासदारही फुटणार'

ठाकरे गटातील १० आमदार आणि दोन खासदारांसोबत आमची चर्चा झाली आहे. आमची त्यांच्यासोबत बैठक झाली आहे, सर्वकाही फायनल झालं आहे, असंही तुमाणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, तुमाणे यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Breaking Marathi News)

लोकसभेसाठी शिंदे गटाने आखला प्लॅन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे, असं शिवसेनेचं खासदार कृपाल तुमाणे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपले घर सांभाळावे, आम्ही आमच्या चिन्हावर लढणार आहोत. शिंदे-फडणवीस यांच्यासोबत आम्ही आहोत, ते जे निर्णय घेतील त्यानुसार आम्ही काम करणार, असंही तुमाणे यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT