Saamana Editorial on Modi-Shah : 'रावणराज्याचा अंत होण्यासाठी...', 'सामना'तून मोदी-शाहांवर आगपाखड

Political news : भाजपच्या पराभवाचे मोदी हेच कारण ठरतील आणि त्याला अमित शाह हातभार लावतील.
Narendra Modi - Uddhav Thackeray
Narendra Modi - Uddhav Thackeray Saam Tv
Published On

Saamana Editorial : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामनातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. सामनात मोदी सरकारचा उल्लेख 'रावणराज्य' करण्यात आला आहे. भाजपला सत्तेवरुन खाली उतरवायचं असेल तर विरोधकांची एकजूट कायम राहिली पाहिजे असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजपच्या पराभवाचे मोदी हेच कारण ठरतील आणि त्याला अमित शाह हातभार लावतील. एकाच राज्यात व त्यातील लोकांकडे सर्व आर्थिक सत्ता एकवटून मोदी व शहा सरळ 'भेद' करीत आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

सगळ्यांनाच 'मी'पणा कमी करावा लागेल

रावणराज्याचा अंत झाल्यावर श्रीरामाचा राज्याभिषेक झाला व अयोध्येत दिवाळी साजरी झाली. त्यामुळे रावणराज्याचा अंत होण्यासाठी वानरसेनाही बरोबर घ्यावी लागेल. त्यासाठी सगळ्यांनाच 'मी'पणा कमी करावा लागेल. आता तरी 'आपल्याला बुवा पंतप्रधान व्हायचे नाही' याच भूमिकेत सर्व नवरदेव आहेत. नवरदेवांनी हेच धोरण ठेवले तर सगळ्यांच्याच मनाप्रमाणे घडेल, असं सामनात म्हटलं आहे.

Narendra Modi - Uddhav Thackeray
Mohan Bhagwat Statement: शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू राष्ट्र! सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

दक्षिणेतला एकमेव दरवाज बंद

कर्नाटकच्या निकालामुळे मोदी-शहांच्या चेहऱ्यावरचा रंग साफ उडाला आहे. दक्षिणेतला एकमेव दरवाजा त्यांच्यासाठी बंद झाला आहे. नव्या संसदेत तामीळनाडूतून खास 'सन्गोल' आणला तरी तामिळी जनता 'हा किंवा तो द्रमुक' सोडून भलत्या-सलत्यांच्या पाठीमागे पळत नाही हा आतापर्यंतचा इतिहास. त्यामुळे दक्षिणेत भारतीय जनता पक्षाने कर्नाटक हे एकमेव राज्य गमावले हा 2024 च्या तोंडावर अपशकुन आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये सोडली तर मोदी-शहांच्या विरोधात संपूर्ण देश उभा ठाकला आहे. (Latest Marathi News)

गुजरात मॉडेल राष्ट्रहिताचे नाही

नितीश कुमार यांनी पाटण्यात 12 जून रोजी भाजप वगळून देशभक्त पक्षांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी बाहेर पडतील. राजकारणातील सध्याचे गुजरात मॉडेल राष्ट्रहिताचे नाही. सर्वच प्रमुख सरकारी पदांवर, आर्थिक पेढय़ांवर एकाच राज्यातील लोकांची नेमणूक केली जात आहे व देशाचा सर्व आर्थिक ओघ एकाच राज्यात वळवला जात आहे. त्यामुळे 'गुजरात विरुद्ध संपूर्ण देश' असा संघर्ष उभा राहिला तर त्याचे खापर मोदी-शहांवर फुटेल. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व सरकारी कामे, त्यांचे ठेके-उपठेके एकाच राज्यातील माणसांना मिळत आहेत. एकाच राज्यात व त्यातील लोकांकडे सर्व आर्थिक सत्ता एकवटून मोदी व शहा सरळ 'भेद' करीत आहेत. 2024 च्या प्रचारात हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. (Latest Political News)

Narendra Modi - Uddhav Thackeray
Saamana Editorial on 9 Years Of Modi : मोदींची 9 वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड, 'सामना'तून सडकून टीका

मोदी-शहांची थापेबाजी उघडी पडत आहे

भारत जोडो यात्रा, कर्नाटकाच्या विजयानंतर राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि पकड मजबूत झाली आहे. मोदी हे ब्रह्मांडासही ज्ञानामृत पाजतात. तसे राहुल गांधींचे नाही. त्यांच्यातील संयम लोकांना आवडू लागला आहे. मोदी-शहांचे मोगली क्रौर्य, अहंकार, उठवळ राजकारण, थापेबाजी दिवसेन्दिवस उघडी पडत आहे. लोकांना पर्याय हवा आहे. भाजप हा अजिंक्य नाही. मोदींचा पराभव होऊच शकत नाही हा भ्रम तुटू लागला आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष हे स्थान भाजपचे उरलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com