Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'सगळ्या योजना जुन्याच, मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसली'; ठाकरे गटाचं शिंदे सरकारवर टीकास्त्र

Maharashtra Politics: बोलघेवड्या घोषणा, थापा देऊन गेले असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Ambadas Danve News In Marathi

मराठवाड्याला 59 हजार कोटींच्या पॅकेजचा बुस्टर डोस मुख्यमंत्र्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला आहे. 2016 मध्ये झालेल्या योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल देत मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करू असं सांगितले. मात्र, बोलघेवड्या घोषणा, थापा देऊन गेले असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

मराठवाड्यात मंत्रिमंडळाने बैठक घेतली. बैठकीत शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने मराठवाड्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांकडून ४५ हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात मराठवाड्यासाठी निर्णय घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिल्यानंतर त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेवर अंबादास दानवे शिंदे सरकारवर टीका केली. अंबादास दानवे यांनी सगळ्या योजना जुन्याच आहेत, नवीन काहीच नाही. केवळ मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसले आहेत, असा आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?

राज्य शासनाने मराठवाड्याच्या विकासासाठी गतकाळात पाणी पुरवठा योजनेसाठी 2 हजार 774 कोटी, रस्त्यांच्या कामासाठी 500 कोटी, पैठण येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मराठवाड्यातील जनतेला पाणी, वीज, रस्ते यासारख्या मुलभूत सुविधांसाठी शासनाने निधी देण्याचे काम केले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

गुजरातकडे जाणारे अतिरिक्त पाणी राज्यासह गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवून येत्या काळात मराठवाड्याला उपयोग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात असे १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असुन राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचेही शिंदे म्हणाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT