Sanjay Raut: गणपती आले आणि नाचून गेले...; मंत्रिमंडळ बैठकीवरून संजय राऊतांचं टीकास्त्र

Sanjay Raut: तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर ही बैठक झाली आहे. दरम्यान खासदार संजय राऊतांनी बैठक झाल्यावर त्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
MP Sanjay Raut
MP Sanjay Raut Saam Tv
Published On

Maharashtra Political News:

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व मंत्र्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर ही बैठक झाली आहे. दरम्यान खासदार संजय राऊतांनी बैठक झाल्यावर त्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

MP Sanjay Raut
Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, कुणाचे आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्षांसमोर आज होणार सुनावणी

"मरठवाड्याला काय मिळालं? साल २०१६ ला देवेंद्र फडणवीसांनी ५० हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. आज त्यांच्याच उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ५९ हजाराच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त भागांना काय मिळालं हे रहस्य अधांतरीच आहे.", अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

गणपती आले आणि नाचून गेले

"सरकारकडे पैसे आहेत कुठे. गेल्या ७२ तासात त्यांच्या तिजोरीचा भार हा कामगार, मंत्री यांचा थाटमाट यांवर खर्च होतोय. कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला. मुख्यमंत्री आले आणि गेले. आपल्या मराठीत पठ्ठे बापूरावर म्हणालेत गणपती आले आणि नाचून गेले. तसाच काहीसा प्रकार येथे मंत्रिमंडळ बैठकीचा झाला. ताफे आले तसे परत गेले.", अशा शब्दांत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला.

हिशोब द्या

तसेच झालेल्या बैठकीचा हिशोब मागत संजय राऊतांनी प्रचंड पैसे खर्च केल्याचं म्हटलं आहे."मंत्रिमंडळाच्या या बैठकीवर प्रचंड पैसा खर्च करण्यात आलेत. या सगळ्याचा हिशोब द्या, किती पैसे खर्च झाले. का झाले त्याची काही गरज होती का? 50 हजार किंमतीच्या सूटमध्ये राहून दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात बैठका होतात. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यांना काय मिळालं?"

तुम्हाला जनतेची भीती वाटते?

"बैठकीमुळे अनेक रस्ते बंद केलेत. नागरिकांचे हाल होतायत. तुम्हाला कोणाची भीती वाटते? जनतेची? तुमच्यावर जनता हल्ला करेल अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर नका ऐऊ जनतेमध्ये. आपापल्या घरी बसून काम करा.", असा खोचक टोला राऊतांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

MP Sanjay Raut
Maharashtra Politics: शरद पवार की अजित पवार, खरी राष्ट्रवादी कोणाची? ६ ऑक्टोबरला होणार सुनावणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com