uddhav thackeray faction claims it as bhanamati incident in sangli  saam tv
महाराष्ट्र

घरावर लिंबू, बाहुली... ठाकरे गटाच्या महिला पदाधिका-यांचा भानामतीचा दावा, पाेलिसांत धाव

साम टीव्हीशी बाेलताना मनीषा पाटील म्हणाल्या शिवसेना उद्धव ठाकरे महिला पदाधिका-यांचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार करण्यात आला आहे. याचा सखाेल तपास व्हावा

विजय पाटील

Sangli News :

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या (uddhav thackeray faction) महिला पदाधिका-यावर भानामतीचा प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेनेच्या महिला नेत्याने सखाेल चाैकशीची मागणी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सांगली जिल्ह्यातील महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सरोजिनी माळी यांच्या घरासमोर आज भानमतीचा प्रकार घडला आहे. माळी यांच्या घराच्या गेटवर लिंबू, बाहुली, नारळ, हळदी, कुंकू टोचलेल्या सुई असे साहित्य असलेली पिशवी ठेवण्यात आली हाेती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर माळी यांनी सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांनाही दिली. (Maharashtra News)

साम टीव्हीशी बाेलाना मनीषा पाटील म्हणाल्या शिवसेना उद्धव ठाकरे महिला पदाधिका-यांचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार करण्यात आला आहे. हा जादूटोणा करण्याचा प्रकार काेणी केला त्याचा शोध घेऊन कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील महिला जिल्हा प्रमुख मनीषा पाटील यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपची जाहीर सभा

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT