shivsena news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना जबरी धक्का, कोकणातील दिग्गज नेता साथ सोडणार

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंना कोकणात जबरी धक्का बसणार आहे. माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समोर आलेय.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray News : विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. ठाकरे गटातून अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील काही नेत्यांनी ठाकरे गाटाला राम राम केला होता. मुंबई, छत्रपतीसंभाजीनगरातूनही अनेक जणांनी ठाकरेंची साथ सोडली होती. आता यामध्ये आणखी भर पडली आहे. रत्निगरी जिल्ह्यातही ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार सुभाष बने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली आहे. त्याशिवाय रोगन बने सुभाष बने, गणपत कदम यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ फेब्रुवारी रोजी कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी रत्नागिरीमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा प्रवेश होणार आहे. माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने आणि सुभाष बने देखील मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात मोठी ताकद आहे. त्याचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फायदा होईल, असे म्हटले जातेय. त्याशिवाय माजी आमदार गणपत कदम यांचा देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश निश्चित झालाय. कदम हे राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे.

राजन साळवी साथ सोडणार ?

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याचे सांगितले जातेय, ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साळवी यांच्या पक्षप्रवेशाचाही मुहूर्त ठरल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT