
Raigad and Nashik Guardian Ministers : रायगडबरोबरच नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटण्याची दाट शक्यता आहे. अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून परतल्यानंतर रविवारी याबाबत निर्णय होईल असं सूतोवाच आमदार दळवी यांनी केलं आहेत. आमच्या मनातील पालकमंत्री होईल, असं सांगून आमदार दळवी यांनी भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील, असे संकेत दिले आहेत.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील खदखद चव्हाट्यावर आली होती. रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना देण्यात आले होते, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे होते. या दोन्ही जिल्ह्यावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला. रायगडसाठी भरत गोगावले इच्छूक आहेत, तर नाशिकसाठी दादा भुसे अग्रही आहेत. पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी खंत बोलून दाखवली होती, त्याशिवाय कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांचा निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडवरून महायुतीमध्ये खदखद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा केंद्रात सुटणार असल्याचे स्पष्ट दिसतेय. एकनाथ शिंदे यांनी रायगड आणि नाशिकसाठी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे आमदार दळवी यांच्या वक्तव्यावरून दिसतेय.
नाशिक-रायगडचा तिढा सुटणार का?
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. महायुतीचे सरकार सत्तेत येऊन तीन महिले झाले, पण अद्याप रायगडवरून खलबतं सुरू आहेत. रायगडसाठी भरत गोगोवाल इच्छूक आहेत. रायगडवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते आमनेसामने आले. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले पाहायला मिळाले. रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते? याकडे लक्ष लागलेय. दुसरीकडे भाजप कोणत्याही परिस्थितीत नाशिक सोडण्यास तयार नसल्याचे समजतेय. दिल्लीच्या दरबारी हा तिढा सुटल्याचे समजतेय. आज याबाबतचा निर्णय जाहीर होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.