Pune : दिलासादायक! जीबीएसचा विळखा सैल, आतापर्यंत ८७ रूग्ण झाले ठणठणीत

Pune GBS : पुण्यात जीबीएस आजाराने थैमान घातले होते, त्याला थोडा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. पुण्यात आतापर्यंत ८७ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर रूग्णांची एकूण संख्या १८३ पर्यंत पोहचली आहे.
GBS patients
GBS patientsSaamTv
Published On

Pue GBS News Update : पुण्यात 'जीबीएस'च्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. मागील 24 तासात पुण्यात जीबीएस आजाराचे 3 रुग्ण वाढले आहेत, त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या 183 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणदे, आतापर्यंत 87 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात जीबीएसमुळे आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील जीबीएस बाधितांची संख्या 183 पर्यंत गेली आहे. त्यातील 87 जण बरे झाले आहेत. तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 47 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. धायरी, नांदेडगाव, सिंहगडरस्ता, किरकटवाडी, खडकवासला या भागातील रुग्णसंख्या अधिक आहे.

GBS patients
पुणे हादरले! जन्मदात्या आईनेच २ चिमुकल्यांचा बळी घेतला, झोपेतच गळा दाबला, पतीवरही कोयत्याने वार

पुणे शहर आणि जिल्ह्यात 183 संशयित बाधितांपैकी 151 रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. त्यामध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये 37 रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून,सर्वाधिक रुग्णसंख्या (88) ही समाविष्ट केलेल्या गावातील आहे. 26 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, 24 रुग्ण पुणे ग्रामीण तर 8 रुग्ण हे इतर जिल्ह्यांतील आहेत.

GBS patients
Pune : पुण्यात लखोबा लोखंडेला बेड्या, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करायचा

आतापर्यंत केलेल्या उपाययोजना

  • राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला त्वरित भेट दिली.

  • पुणे मनपा व जिल्ह्याला बाधित भागामध्ये सर्वेक्षण सुरु करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

  • शहराच्या विविध भागातील ४७६१ पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत त्यापैकी ५५ पाणी नमुने स्त्रोत पिण्यास अयोग्य आहेत.

  • आरोग्य शिक्षण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.

  • खाजगी वैदयकीय व्यवसायिकांना आवाहन करण्यात आले हे की, जीबीएस रुग्ण आढळुन आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे.

  • नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नसुन आरोग्य विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत तयारी आहे.

  • घरोघरी सर्वेक्षण अंतर्गत आजपर्यंत पुणे मनपा ४६५३४ घरे, पिंपरी चिंचवड मनपा २४८८३ घरे व पुणे ग्रामीण १३२९१ अशा एकूण ८४७०८ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

  • Antiganglioside Antibodies तपासणीसाठी ८० सिरम नमुने NIMHANS बेंगलोर येथे पाठविण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com